नाशिक

अकरा अभ्यासक्रमांना सीईटीच्‍या दोन संधी

CD
अकरा अभ्यासक्रमांना ‘सीईटी’च्‍या दोन संधी --- शैक्षणिक वर्ष २०२७ मधील २१ सीईटी परीक्षांचे संभाव्‍य वेळापत्रक जाहीर सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. १६ : शैक्षणिक वर्ष २०२७-२८ साठी पदवी आणि पदव्युत्तर व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर झाले आहे. महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे या परीक्षा घेतल्या जातील. यंदा एकूण २१ सीईटी परीक्षा घेतल्‍या जाणार असून, यापैकी ११ अभ्यासक्रमांसाठी दोन वेळा परीक्षा देण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळेल. या संदर्भात उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी माहिती दिली. त्‍यांनी दिलेल्‍या माहितीनुसार, यंदापासून पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन मॅनेजमेंट (पीजीडीएम, पोस्ट ग्रॅज्युएट सर्टिफिकेट इन मॅनेजमेंट (पीजीसीएम) आणि जनरल नर्सिंग ॲन्ड मिडवायफरी (जीएनएम) या तीन अभ्यासक्रमांच्या सीईटी प्रथमच घेतल्या जाणार आहेत. जानेवारीत परीक्षा सुरू होऊन १० जून २०२७ पर्यंत विविध सीईटी परीक्षा पार पडतील. २०२६ मध्ये झालेल्‍या २० सीईटी परीक्षांसाठी १८ लाख १४ हजार ४५६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. १६ लाख ३१ हजार ३३५ विद्यार्थ्यांनी प्रत्‍यक्षात परीक्षा दिली होती. विद्यार्थ्यांना परीक्षेच्या अधिक संधी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने यंदा दोन वेळा सीईटी घेण्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला असून, ११ अभ्यासक्रमांच्‍या विद्यार्थ्यांना याचा लाभ होईल. दरम्यान, तीनवर्षीय एकात्मिक बी.एड.-एम.एड. अभ्यासक्रमाची सीईटी यंदा घेतली जाणार नाही. राज्यात हा अभ्यासक्रम एकाच संस्थेत सुरू असून, एकूण ५५ जागांपैकी यंदा केवळ १२ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. एम.पी.एड. व एम.एड. व बी.एड. या परीक्षा जूनमध्ये घेण्याची मागणी विद्यार्थी व संस्थांची होती. त्यानुसार बदल केला आहे. सीईटी कक्षाने जाहीर केलेले हे वेळापत्रक संभाव्य असून, विद्यार्थ्यांनी अधिकृत वेळापत्रक व पुढील सूचनांसाठी सीईटी कक्षाच्या संकेतस्‍थळाला भेट देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. इन्‍फो या अभ्यासक्रमांना मिळणार दोन संधी राष्ट्रीय स्तरावर जेईई मेनच्या दोन परीक्षा घेतल्या जातात. याच धर्तीवर महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना दोन संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने गेल्या वर्षापासून पीसीएम, पीसीबी आणि एमबीए/एमएमएस या तीन अभ्यासक्रमांच्या सीईटी दोन वेळा घेतल्‍या आहेत. या प्रयोगाला मिळालेला प्रतिसाद लक्षात घेऊन यंदा आणखी आठ अभ्यासक्रमांचा समावेश केला. त्यानुसार पीसीएम, पीसीबी, एमबीए/एमएमएस, पीजीडीएम, पीजीसीएम, पाचवर्षीय एलएल.बी., बीएचएमसीटी, बीसीए, बीबीए, बीएमएस आणि बीबीएम अशा एकूण ११ अभ्यासक्रमांसाठी दोन वेळा सीईटी घेतली जाईल. विद्यार्थ्यांना पहिली सीईटी देणे बंधनकारक असून, दुसरी सीईटी ऐच्छिक असेल. दोन्ही परीक्षा दिल्यास प्रवेशासाठी विद्यार्थ्यांच्या अधिक पर्सेंटाइल गुण असलेल्‍या सीईटीचे गुण ग्राह्य धरले जातील. इन्‍फोः या अभ्यासक्रमांसाठी प्रथमच सीईटी शासनाच्या निर्देशानुसार यंदा पीजीडीएम, पीजीसीएम आणि जीएनएम नर्सिंग या व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी प्रथमच सीईटी घेतली जाईल. यात पीजीडीएम आणि पीजीसीएम अभ्यासक्रमांसाठी दोन वेळा परीक्षा होणार आहे. पीजीडीएम, पीजीसीएमची सीईटी एमबीए सीईटीबरोबर घेतली जाईल. इन्‍फोः (सूचना ः अभ्यासक्रम, पहिली संधी, दुसरी संधी) असा तक्‍ता करून घ्यावा.) -------------------- २०२७ मध्ये होणाऱ्या सीईटी परीक्षांचे संभाव्‍य वेळापत्रक ः * एमबीए/एमएमएस/ पीजीडीएम / पीजीसीएम- पहिली संधी ः २८ ते ३० जानेवारी. दुसरी संधी ः १ ते ३ एप्रिल. * एलएल.बी. (५ वर्षे)ः पहिली संधी ः २८ व २९ मार्च. दुसरी संधी ः २४ मे * एमएचटी-सीईटी-पीसीबी ग्रुप ः पहिली संधी ः ८ ते १३ एप्रिल. दुसरी संधी ः ६ ते ८ मे * एमएचटी-सीईटी-पीसीएम ग्रुप- पहिली संधी ः १६ ते २६ एप्रिल. दुसरी संधी ः १० ते १५ मे. * बीएचएमसीटी/ बीसीए/ बीबीए/ बीएमएस/ बीबीएम- पहिली संधी ः २८ ते ३० एप्रिल. दुसरी संधी ः २७ व २८ मे. -------------------- २०२७ मधील सीईटी परीक्षांच्‍या संभाव्‍य तारखा ः * एमएचएमसीटी- २४ मार्च * एमसीए- २७ मार्च * एएसी- कला शिक्षण- ११ एप्रिल * बी. डिझाइन- १८ एप्रिल * एलएल.बी. (३ वर्षे)- ४ व ५ मे * डीपीएन/ पीएचएन- १८ मे * नर्सिंग- १८ व १९ मे. * जीएनएम-नर्सिंग- २१ व २२ मे. * एमपीएड- ५ जून. * एमएड- ६ जून. * बीएड (जनरल व स्पेशल) व बीएड (इएलसीटी)/ बीपीएड- ८ ते १० जून

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Price: हॉलमार्क असलेलं सोनं खरंच शुद्ध असतं का? CAG च्या अहवालाने उघड झाला सरकारी यंत्रणेचा ढिसाळपणा

Syed Mushtaq Ali Trophy: संजू सॅमसनची तुफानी फटकेबाजी अन् मग निधीशच्या ५ विकेट्स; महाराष्ट्राचा केरळकडून दारुण पराभव!

Professor Recruitment Issue : प्राध्यापक भरतीचा मुहूर्त कधी? नऊ महिन्यांपासून प्रक्रिया रखडली; नेट-सेट, पीएच.डी.धारकांचे पुण्यात बेमुदत धरणे आंदोलन

Water Cut Decision : वाढीव पाणी कपातीचा निर्णय लांबणीवर; पाटबंधारे विभागासोबतच्या निर्णयानंतर अंमलबजावणी

Pune News : वॉर्डन पुरविण्याची कोंडी सुटली; आयुक्तांनी स्थगिती उठवली

SCROLL FOR NEXT