exam pressure latest marathi news
exam pressure latest marathi news esakal
नाशिक

Nashik : CET, पुणे विद्यापीठाची परीक्षा एकाच दिवशी

अरूण मलाणी

नाशिक : विधी शाखेच्‍या तीन वर्षे कालावधीच्‍या पदवी अभ्यासक्रमाच्‍या प्रवेशासाठीची सीईटी परीक्षा (CET Exam) व विद्यापीठाच्‍या (SPPU Exam) अंतिम वर्षाची परीक्षा एकाच दिवशी असल्‍याचा प्रकार निदर्शनास आला आहे. अनेक विद्यार्थ्यांमध्ये यामुळे द्विधा स्‍थिती निर्माण होत असल्‍याने कुठल्‍या तरी एका परीक्षेच्‍या वेळापत्रकात बदल करण्याची मागणी विद्यार्थ्यांकडून होत आहे. (CET Pune University Exam on One Day nashik latest marathi news)

सीईटी सेलतर्फे राज्‍यस्‍तरावर विविध अभ्यासक्रमांच्‍या प्रवेशासाठी सीईटी परीक्षा घेतली जात आहे. याअंतर्गत ३ वर्षे कालावधीच्‍या एलएलबी अभ्यासक्रमासाठी ३ आणि ४ ऑगस्‍ट असे दोन दिवस परीक्षा घेतली जाणार आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे वेगवेगळ्या अभ्यासक्रमांची अंतिम वर्षाची परीक्षादेखील सध्या सुरु आहे. नेमके ३ ऑगस्‍टच्‍या दिवशी सीईटी आणि काही अभ्यासक्रमांसाठीची अंतिम वर्षाची लेखी परीक्षा असल्‍याने विद्यार्थ्यांमध्ये द्विधा स्‍थिती निर्माण झालेली आहे.

३ ऑगस्‍टला सकाळी नऊ ते अकरा या वेळेत सत्र आयोजित केला असून, लेखी परीक्षादेखील नऊ ते अकरा या वेळेतच नियोजित आहे.कुठल्‍या तरी एका अभ्यासक्रमाच्‍या परीक्षा वेळापत्रकात बदल करावा, अशी मागणी विद्यार्थ्यांकडून केली जाते आहे.

अन्‍यथा परीक्षेपासून मुकावे लागणार

परीक्षा वेळापत्रकात बदल केला नाही, तर विद्यार्थ्यांना कुठली तरी एक परीक्षेलाच सामोरे जाता येईल. अन्‍य परीक्षेपासून मुकावे लागेल.अशात विद्यापीठ परीक्षा नाही दिली तरी पुर्नपरीक्षेची वेळ विद्यार्थ्यांवर ओढावेल. तर सीईटी नाही दिली तर एलएलबीच्‍या प्रवेशापासून मुकावे लागणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT