Community members participating in chain hunger strike on Tuesday to defend OBC reservation esakal
नाशिक

Nashik News: ओबीसी आरक्षण बचावासाठी राजापूरला साखळी उपोषण सुरू; सकल ओबीसी समाजाचे पहिले आंदोलन

सकाळ वृत्तसेवा

येवला : ‘लढाई अस्तित्वाची, लढाई स्वाभिमानाची’, असा नारा देत ओबीसी प्रवर्गाच्या आरक्षणास धक्का लाऊ नका यांसह इतर मागण्यांसाठी राजापूर येथे मंगळवार (ता. २१)पासून ओबीसी समाजबांधवांनी साखळी उपोषण सुरू केले आहे.

जिल्ह्यातीलच नव्हे, तर राज्यातील ओबीसींचे हे पहिले आंदोलन असल्याने आंदोलनाची जोरदार चर्चा सुरू आहे. (Chain hunger strike begins in Rajapur to defend OBC reservation First movement of total OBC community Nashik News)

सर्वत्र मराठा आरक्षणासाठी आंदोलने सुरू असून, तालुक्यातही अनेक ठिकाणी सुरू असलेल्या आंदोलनाला सर्वपक्षीयांनी व इतर समाजाबांधवांनीही पाठिंबा दिला आहे.

मात्र, अंबड येथील मेळाव्यानंतर आरक्षणाचा विषय पुन्हा तप्त झाला आहे. त्याच पार्श्वभूमीवर ओबीसींचे नेते छगन भुजबळ यांच्या मतदारसंघातच ओबीसींचे आंदोलन सुरू झाले आहे.

राजापूर येथे शनिमंदिराच्या प्रांगणात ओबीसी बांधवांनी बेमुदत साखळी उपोषणास प्रारंभ केला असून, मागण्यांचा फलक लावत अतिशय शांततेत आंदोलनाला सुरवात झाली.

व्ही. एन. नाईक शिक्षण संस्थेचे संचालक विजय सानप यांच्या नेतृत्वाखाली उपोषणास प्रारंभ झाला आहे. सानप, अनिल वाघ, भाऊसाहेब भाबड, समाधान दराडे, राजेंद्र कासार, सोमनाथ अलगट आदी ओबीसी बांधवांच्या उपस्थितीत सकाळी नऊपासून आंदोलनाला प्रारंभ झाला.

ओबीसी प्रवर्गाच्या आरक्षणास धक्का न लावता मराठा समाजाला स्वतंत्र प्रवर्ग निर्माण करून हवे तेवढे आरक्षण द्यावे, ओबीसी प्रवर्गात असणाऱ्या सर्वांची जनगणना करावी, ओबीसी समाजाच्या आरक्षणाच्या टक्केवारीत लोकसंख्येच्या प्रमाणांनुसार वाढ करावी, महाज्योती, (कै.) वसंतराव नाईक, (कै.) गोपीनाथराव मुंढे महामंडळास मोठी अर्थिक तरतूद करून अनुदान देण्यात यावे, जात पडताळणी प्रक्रिया सुलभ करण्यात यावी या मागण्यांसाठी हे आंदोलन सुरू झाले आहे.

ओबीसींच्या मागण्या मान्य होत नाही, तोपर्यंत हा लढा अशाच पद्धतीने लढला जाईल, असा इशारा विजय सानप, समाधान दराडे, अनिल वाघ आदी कार्यकर्त्यांनी दिला आहे.

उपोषणास राजेंद्र कासार, सुभाष वाघ, राजेंद्र सानप, चिंधा सानप, भाऊसाहेब भाबड, मच्छिंद्र चव्हाण, संजय भाबड, वाल्मीक वाघ, विठ्ठल मुंडे, संपत धात्रक, अण्णा दराडे, पांडुरंग आव्हाड, भिका जाधव, वसंत नागरे, विजय धात्रक, गोकुळ वाघ, अनिल अलगट, शंकर अलगट, विलास घुगे, सोमनाथ अलगट, रामदास घुगे,

भारत वाघ, नवनाथ सोनवणे, रामदास जाधव, निवृत्ती वाघ, सुनील मुंडे, सोमनाथ भाबड, शरीफ शेख, अशोक आव्हाड, बबन भाबड, सुदर्शन भाबड, शिवाजी विंचू, विजय घुगे, शंकर इप्पर, किरण सोनवणे, शांताराम शिरसाठ, कारभारी जाधव, शिवाजी बोडके, पुंडलिक विंचू, मारुती बोडके, साखरचंद घुगे, अण्णा दराडे, सचिन सानप आदी कार्यकर्त्यांनी उपोषणकर्त्यांना पाठिंबा दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'वारीत कोणी विशेष अजेंडा चालवण्यासाठी येत असतील, तर ते आम्ही खपवून घेणार नाही'; CM फडणवीसांचा कोणाला इशारा?

Ashadhi Ekadashi : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न; पंढरपुरात 20 लाखाहून अधिक भाविक दाखल

Ashadhi Ekadashi : विठ्ठलाच्या पूजेचा मान मिळालेले उगले दाम्पत्य कोण आहे? मुख्यमंत्र्यांसोबत मिळाला शासकीय महापूजेचा मान

Ashadhi Ekadashi : 'ज्ञानोबा माऊली'च्या गजरात CM देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर; पारंपरिक वेशात घेतला सहभाग

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : 'महाराष्ट्र चालवण्याची विठुरायाने शक्ती द्यावी', मुख्यमंत्री फडणवीसांनी पांडुरंगाला घातले साकडे

SCROLL FOR NEXT