On the occasion of Chaitra Purnima and Hanuman birth anniversary in the temple hall, a queue of devotees for darshan and the hall decorated with flower garlands. esakal
नाशिक

Chaitra Pournima : आदिमाया सप्तशृंगीची पंचामृत महापूजा; लाखो भाविक नतमस्तक

सकाळ वृत्तसेवा

Chaitra Poornima : कोट्यवधी भाविकांच्या श्रद्धास्थान असलेल्या साडेतीन शक्तीपीठांपैकी आद्यस्वयंभू शक्तिपीठ असलेल्या सप्तशृंगगडावर श्रीराम नवमीपासून श्री भगवतीचा चैत्रोत्सव सुरु आहे, या उत्सवादरम्यान लाखो भाविक नतमस्तक झाले असून नवस मोठ्या श्रद्धेने फेडले जात आहे.

चैत्र पौर्णिमा (हनुमान जन्मोत्सव) निमित्त विविध धार्मिक पूजा-अर्चा यासह विश्वस्त संस्थेच्या कार्यालयातून महावस्त्र व अलंकाराची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. (Chaitra Poornima Panchamrit Mahapuja of Adimaya Saptashringi devi vani gad Millions of devotees bow down nashik news)

चैत्र पौर्णिमेची आजची सकाळची पंचामृत महापूजा विश्वस्त संस्थेचे अध्यक्ष तथा अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश वर्धन पी. देसाई व राहुल सप्रा यांनी सपत्नीक केली. चैत्रोत्सव सुरळीत पार पडण्याच्या दृष्टीने स्वयंसेवी संघटनांनी हातभार लावलेला आहे.

त्यात सतत १५ वर्ष भाविकांची सुरक्षा व संभाव्य आपत्कालीन परिस्थितीच्या नियंत्रणात तत्परतेने नि:शुल्क सेवा देणारे अनिरुद्धाज ॲकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंटचे स्वयंसेवक तत्परतेने सेवा देत आहे, वर्षभरात भरणाऱ्या उत्सवात प्रामुख्याने चैत्र व अश्विन यात्रेत किमान १५० ते २०० या संख्येने स्वयंसेवक (डीएमव्ही) सहभागी होतात, विश्वस्त संस्था त्यांना नि:शुल्क निवास, अल्पोपाहार, भोजन व्यवस्था उपलब्ध करून देते.

हेही वाचा : जीएसटीसाठी नोंदणी केलीच नाही तर??

भाविकांच्या सेवेचा हा यज्ञ अनिरुद्ध महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. उत्सव काळात सेवा देणारे सर्व स्वयंसेवक हे आपत्ती व्यवस्थापन प्रक्रियेतील प्रशिक्षित असून गर्दीचे नियोजन करणे, संभाव्य आपत्ती उद्भवणार नाही तसेच, उद्भवल्यास त्वरित मदत कार्य करण्यासाठी कार्यरत आहे.

जिल्हा प्रशासन, उपविभागीय पोलिस अधिकारी, महसूल प्रशासन, गट विकास अधिकार, पोलिस निरीक्षक, सहा. पोलिस निरीक्षक, अधिक्षक उपजिल्हा रुग्णालय, तालुका वैद्यकीय अधिकारी, वन परिक्षेत्र अधिकारी, कार्यकारी अभियंता - वीज वितरण, उप अभियंता सा. बा. कळवण,

उप अभियंता ग्रामीण पाणी पुरवठा, सहा. आयुक्त अन्न व औषध प्रशासन, राज्य परिवहन महामंडळ, राज्य उत्पादन शुल्क विभाग, मंडल अधिकारी, दूर संचार विभाग, ग्रामपंचायत सप्तशृंगगड / नांदुरी तसेच अध्यक्ष व विश्वस्त मंडळाचे सहकार्य लाभले, अशी माहिती विश्वस्त संस्थेमार्फत देण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubman Gill: भारताच्या सर्वात मोठ्या विजयासह कर्णधार गिलने मोडला गावसकरांचा ४९ वर्षांपूर्वीचा विक्रम अन् घडवला नवा इतिहास

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT