शेतकऱ्याच्या खिशातून
चाळीसगावला ५० हजार लंपास
---
बैल विक्रीची रक्कम लंपास झाल्याने पशुपालक हवालदिल
सकाळ वृत्तसेवा
चाळीसगाव, ता. ५ : बाजार समितीतील जनावरांच्या बाजारात बैल विक्रीसाठी आलेल्या शेतकऱ्याच्या खिशातील ५० हजार रुपयांची रोकड चोरट्यांनी लांबविली. ही घटना शनिवारी (ता. ३) सकाळी दहाच्या सुमारास घडली.
गुढे (ता. भडगाव) येथील शेतकरी दौलत विक्रम पाटील शनिवारी चाळीसगाव बाजार समितीत बैल विक्रीसाठी आले होते. त्यांनी दोन बैल ५० हजार रुपयांना विकले व आलेली रक्कम पँटच्या खिशात ठेवली. बाजारातील गर्दीत त्यांच्या उजव्या बाजूच्या खिशाला कोणीतरी हात लावल्याचे त्यांना जाणवले. त्यांनी खिशात हात घातला असता, पैसे गायब असल्याचे लक्षात आले. परिसरात शोध घेऊनही पैसे न मिळाल्याने चोरट्याने ते लंपास केल्याचे स्पष्ट झाले. या प्रकारामुळे शेतकरी पाटील यांना मोठा धक्का बसला. याबाबत पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शहर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.
दरम्यान, यंदा दुष्काळी परिस्थितीमुळे खरीप हंगाम वाया गेल्याने शेतकरी हवालदिल झाला असून, जनावरांच्या चारा-पाण्याचा प्रश्न बिकट झाल्याने शेतकरी जनावरे विकण्यासाठी बाजारात आणत आहेत. अशा परिस्थितीत बाजारात उसळणाऱ्या गर्दीचा गैरफायदा घेत खिसेकापू टोळ्या सक्रिय झाल्याचे या घटनेवरून समोर आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.