बसस्थानकात हरवलेले सोन्याचे
दागिने पोलिसांकडून परत
---
चाळीसगाव पोलिसांनी ‘सीसीटीव्ही’च्या मदतीने घेतला शोध
सकाळ वृत्तसेवा
चाळीसगाव, ता. १६ ः येथील बसस्थानकात गहाळ झालेले सहा ग्रॅम सोन्याचे कानातील दागिने शहर पोलिसांनी ‘सीसीटीव्ही फुटेज’च्या मदतीने शोधून महिलेला परत केले. हे दागिने सापडल्यानंतर प्रामाणिकपणे पोलिसांच्या स्वाधीन करणाऱ्या हर्षदा माळी यांचेही कौतुक होत आहे.
दीपाली विलास पाटील (रा. टाकळी प्र. दे., ता. चाळीसगाव) यांचे रविवारी (ता. १५) बसस्थानक परिसरात सहा ग्रॅम सोन्याचे कानातील दागिने गहाळ झाले होते. याबाबत माहिती मिळताच पोलिस निरीक्षक अमितकुमार मनेळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कर्मचाऱ्यांनी तपास सुरू केला. बसस्थानक परिसरातील ‘सीसीटीव्ही फुटेज’ तपासले असता, हे दागिने हर्षदा भास्कर माळी (रा. श्यामवाडी, ता. चाळीसगाव) यांना सापडल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार, पोलिसांनी त्यांच्याकडे विचारणा केली असता, त्यांनी दागिने सापडल्याचे सांगून ते प्रामाणिकपणे पोलिसांच्या स्वाधीन केले. त्यानंतर पोलिसांनी दागिने दीपाली पाटील यांना परत केले. पोलिसांच्या तत्परतेमुळे आणि हर्षदा माळी यांच्या प्रामाणिकपणामुळे महिलेचे हरविलेले दागिने पुन्हा मिळाले. या कामगिरीबद्दल पोलिस कर्मचारी कुंदन अडकमोल, राकेश महाजन, प्रवीण पवार, प्रवीण महाजन, नंदकिशोर महाजन, विजय महाजन आणि हर्षदा माळी यांचे पोलिस निरीक्षक अमितकुमार मनेळ यांनी अभिनंदन केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.