Devotees visiting Khandoba idol on the occasion of Champa shashti at temple hill at deolali camp esakal
नाशिक

Champa Shashti : खंडेराव टेकडीवर गुंजला ‘जय मल्हार’चा गजर

सकाळ वृत्तसेवा

देवळाली कॅम्प (जि. नाशिक) : येळकोट येळकोट जय मल्हार, खंडेराव महाराज की जय अशा जयघोष व बेल-भंडाऱ्याची उधळण करीत हजारो भाविकांच्या उपस्थितीत खंडेराव भक्त उत्तम मांडे यांनी बारा गाड्या ओढल्या. हा क्षण डोळ्यात साठवण्यासाठी भाविकांची गर्दी उसळली होती. देवळाली शहरातून शिंगवे बहुलाकडे जाणाऱ्या रस्त्यावर हिरव्यागार वनराईत वसलेल्या या छोट्याशा खंडेराव टेकडीवर चंपाषष्ठीनिमित्त होणाऱ्या यात्रोत्सवात दिवसभरात हजारो भाविकांनी दर्शन घेत भंडाऱ्याची उधळण केली. (Champa Shashti Jai Malhar chanting celebrations at temple hill khandoba mandir nashik new)

प्राचीन देवस्थान असणाऱ्या खंडेराव टेकडी यात्रेत पहाटे पुरोहित विठ्ठल देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली प्रकाश आमले, अथर्व आमले, अर्णव, आमले, दक्ष आमले व देवळाली कॅम्प पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक कुंदन जाधव यांच्या हस्ते पूजा अभिषेक व महापूजा करण्यात आली. कँटोन्मेंट बोर्डाच्या नामनिर्देशित सदस्या प्रीतम आढाव यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. येथील खंडेराव मूर्तीसह म्हाळसा- बाणाईच्या मूर्तींना नवीन पोशाख परिधान करून अलंकाराने सजविण्यात आले.

अण्णाज टेंपल हिल ग्रुपतर्फे सालाबादप्रमाणे महाआरती करण्यात येऊन नागेश देवाडिगा, सचिन ठाकरे, दीपक बलकवडे, धीरज मांडे, सुरेश शेटे, राजू चौधरी, संतोष घोडे, भगवान शिंदे, दत्तेशी परदेशी, शंकर मुठाळ, राजू चौधरी, संजय भुतडा, राजू पगारे आदींसह सदस्यांनी मंदिरात आरती करत भाविकांना भरीत भाकरीच्या प्रसादाचे वाटप केले. भगूर येथून आमले परिवाराकडून संबळच्या तालावर निघणारी मानाची काठी व पालखी मिरवणूक टेकडीवर आणली. येथे पूजन व महाआरती झाल्यानंतर भाविकांना महाप्रसादाचे वाटप झाले.

हेही वाचा : भारतीय उत्पादनांच्या खरेदीतली वाढ बनवेल देशाला आर्थिक महासत्ता...

वसभर परिसरातील भाविकांकडून भरीत भाकरीचा नैवेद्य अर्पण करण्यासाठी रीघ मंदिरात लागलेली होती. सांयकाळी शहरात वाजतगाजत मिरवणूक काढण्यात आली, तर सांयकाळी बारा बैलगाड्या ओढण्याचा कार्यक्रम झाला. या वेळी खंडेराव भक्त उत्तम मांडे हे टेकडीवरून धावत येत बैलगाड्या ओढल्या. या वेळी प्रवीण पाळदे , भारत वाघमारे आदींसह मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते.

सांयकाळी परिसरात स्थानिकांसह जिल्हाभरातून भाविकांनी यात्रेस हजेरी लावली. रात्रभर जागरण गोंधळाच्या कार्यक्रम होऊन सकाळी म्हाळसा व खंडेरावाचे लग्न लावण्यात आला. बुधवारी (ता. ३०) सकाळी अकरा वाजता यात्रा परतीची आरती होईल व सांयकाळी कुस्ती स्पर्धा होणार आहे. यात्रोत्सवासाठी मंदिराचे विश्वस्त प्रकाश आमले, उत्तम मांडे, भारत वाघमारे, अथर्व आमले, पहिलवान प्रवीण पाळदे व सेवेकरी प्रयत्नशील आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT