Khandoba Miravnuk SYSTEM
नाशिक

Champa Shashti : खंडोबाच्या भेटीस मल्हारी राजा प्रथमच रथातून; मंदिराला 60 वर्षे पूर्ण

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : पंचवटीचा मल्हारी राजा प्रथमच रथातून खंडोबाच्या भेटीस पहाटेच रामतीर्थावर दाखल झाला. चंपाषष्ठीनिमित्त गेल्या तेवीस वर्षापासून पंचवटी राजाची पालखी खंडोबाच्या भेटीस येत असते. या वर्षापासून मंगळवारी (ता. २९) राजाचा रथोत्सव सुरू करण्यात आला असून, रथाचे वजन दोन हजार किलो आहे.‍ रथातील कडेपठारचे मल्हारी राजाचे रूप तसेच पालखीत राजाची चांदीची मुर्ती देवाच्या भेटीस सकाळीच दाखल झाली.‍ (Champa Shashti Visiting Khandoba by Malhari Raja for first time in chariot Temple completes 60 years Nashik news)

हेही वाचा : दुधाच्या प्लास्टिक पिशवीचा कापलेला छोटा कोपराही घडवेल अनर्थ...

पंचवटीतील कचरू निकम हे दरवर्षी जेजुरीला जात. ते भंडारी बाबा या नावानेही प्रसिद्ध होते. एकदा ते जेजुरीला गेले असता‍ कऱ्हा नदीपासून त्यांच्या मागे एक कुत्रे कठेपठारपर्यंत त्यांच्याबरोबर होते, पुढे बसच्या प्रवासात ते येवू शकले नाही. जेव्हा बाबा पंचवटीत पोचले त्यांना तेच कुत्रे तिथे दिसले त्यांना आश्चर्य वाटले मात्र काही वेळात ते गुप्त झाले. कुत्रे ज्या स्थानी गुप्त झाले, तिथे त्यांनी मल्हारी राजाची स्थापना केली. मंदिराला साठ वर्षे झाली आहेत. सध्या त्यांचे पुत्र रवींद्र निकम हे देवाचे भक्ती व पूजारी आहेत.

माघी पौर्णिमेला जेजुरी येथे होळकरांच्या कारकिर्दीतला होलमराजे हे खंडोबाचे निस्सीम भक्त होते. जेजुरीला माघी पौर्णिमेला संगमनेरचे होलमराजे यांची प्रथम मानाची काठी म्हणून मान आहे व तृतीय प्रासादिक मान हा पंचवटीचा मल्हारी राजाची काठीला आहे. चंपाषष्ठीला मल्हारी राजा देवस्थान ट्रस्ट संस्थापक रवींद्र निकम यांच्याकडून गंगाघाट ते नाशिक अशी मल्हार रथाची मिरवणूक काढण्यात आली. खंडोबा स्थानी मल्हारी राजांचे रथ व पालखी सकाळी दहाच्या सुमारास भेट होऊन मिरवणूक मूळ स्थानी दुपारी २.३० च्या सुमारास पोचली. देवाला नैवेद्य दाखवून, तळी भरण्यात आली व आरती करण्यात आली. तसेच सायंकाळी बारा गाड्या रथाला जोडून ओढण्याचा कार्यक्रम झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video : समोरा समोर दोन बसची भयानक टक्कर; अपघाताचा थरारक व्हिडिओ व्हायरल, पाहून शॉक व्हाल..

IND vs ENG 2nd Test : रवींद्र जडेजाने 'तलवार' उपसली! कपिल देव यांचा विक्रम मोडला, Sobers सारख्या दिग्गजांसोबत जाऊन बसला

Latest Maharashtra News Updates : महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेकडून बाळासाहेब लांडगे यांचं निलंबन

बाबा वेंगाचं भाकीत खरं ठरणार? पुढच्या 6 महिन्यात 'या' 4 राशी करोडपती होणार? कोणत्या त्या राशी जाणून घ्या...

Pune Accident: बसची वाट बघत उभे होते, तेव्हाच टेम्पो काळ बनून आला अन्..., दोघांचा जागीच मृत्यू, घटनेने पुण्यात खळबळ

SCROLL FOR NEXT