Nashik Crime : नाशिक रोड येथे सध्या चंदनाचे झाड चोरट्यांचे लक्ष ठरत आहे. रात्री चंदनाची झाडे चोरीला जात आहे. त्यामुळे उद्यानांमध्ये पेट्रोलिंग वाढवावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
वनौषधी व शोभेच्या झाडांसाठी प्रसिद्ध असलेल्या जेल रोडच्या अमृत गार्डनमध्ये तिसऱ्यांदा चंदनाचे वृक्ष चोरट्यांनी तोडून नेल्याने संताप व्यक्त होत आहे. (Chandan thief active on Nashik Road Nashik Crime)
जेल रोड येथील अमृत गार्डनच्या उद्घाटनावेळी श्रेयासाठी राजकीय पक्षांची चढाओढ लागली होती. या निसर्गरम्य गार्डनला कोणीच वाली नाही. वॉचमन नसल्यामुळे गार्डनचे गेट दिवसभर उघडे असते. कुंपणाच्या तारा तोडण्यात आल्या आहेत.
त्यामुळे जुगारी, मद्यपी, प्रेमीयुगल येऊन बसतात. गार्डनमधील शौचालयाची दुरवस्था झाल्याने त्याला कुलूप लावण्यात आले आहे. याचाच फायदा घेऊन चंदन चोरांनी ही झाडे चोरून नेले आहेत.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
गंधर्वनगरी, जयभवानी रोड, मोटवानी रोड, प्रेस लगतचा परिसरात या आधी अनेक चंदनाची झाडे चोरी गेल्याचे नोंद सरकार दप्तरी आहे. शेलार मळा येथे रात्री सात चंदनाची झाडे चंदन चोरांनी चोरली होती.
"सध्या चंदनाच्या झाडांवर चोरांनी डल्ला मारायचे ठरवले आहे. नागरिकांनी सजग राहून चंदन चोरांना पकडून दिले पाहिजे. शिवाय पोलिसांनी उद्यानांमध्ये रात्री गस्त वाढवायला हवी."
- राहुल तुपे, रहिवासी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.