नाशिक

चांदगावात आदिवासी वस्तीत भीषण आगीत संसार जळून खाक

CD
YEO26B27487 चांदगाव : येथे आगीत भस्मसात झालेले मोरे यांचे घर ---------- ३६-२ चांदगावात झोपडीला आगीत संसार खाक ---------- मोरे यांचे कुटुंब उघड्यावर, मदतीची मागणी ------------ ​सकाळ वृत्तसेवा येवला, ता. १२ : चांदगाव येथील आदिवासी वस्तीत लक्ष्मीपूजनाच्या दिवशी मनोहर मोरे यांच्या राहत्या झोपडीला दुपारी भीषण आग लागली. त्यात मोरे यांच्या घरातील सर्व संसारोपयोगी साहित्य, धान्य, कपडेलत्ता, भांडी आणि रोख रक्कम जळून खाक झाली. या कुटुंबाचा ऐन दिवाळीच्या सणात संपूर्ण संसार उघड्यावर पडल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. ​दुपारी अचानक मोरे यांच्या झोपडीतून धुराचे लोट निघू लागले. क्षणात आगीच्या ज्वालांनी संपूर्ण झोपडीला विळखा घातला.झोपडी लाकूडफाटा आणि गवताची असल्याने आगीने अवघ्या काही मिनिटांत रौद्ररूप धारण केले. वस्तीतील नागरिकांनी आरडाओरड ऐकून तत्काळ धाव घेतली आणि पाण्याचे हंडे, बादल्या आणून आग विझवण्याचे प्रयत्न केले. आग प्रचंड असल्याने घरातल्या वस्तू बाहेर काढण्याची संधी मिळाली नाही.आग नियंत्रणात येईपर्यंत संपूर्ण घर आणि त्यातील साहित्य जळून कोळसा झाले होते. आगीच्या तांडवातून कुटुंब सुदैवाने बचावले असले तरी त्यांची आर्थिक आणि मानसिक स्थिती पूर्णपणे ढासळली आहे.कष्टाने उभा केलेला संसार डोळ्यादेखत जळून राख झाल्याचे पाहून कुटुंबातील सदस्यांनी आक्रोश केला. घरात साठवून ठेवलेले महिनाभराचे अन्नधान्य, दिवाळीसाठी आणलेले सामान, मुलांचे कपडे, महत्त्वाची कागदपत्रे आणि मोलमजुरी करून साठवलेली पुंजी असा सर्व ऐवज आगीच्या भक्ष्यस्थानी पडला आहे. सध्या या कुटुंबाकडे अंगावरील कपडे वगळता काहीही शिल्लक राहिलेले नाही. लहान मुलांना घेऊन आता राहायचे कुठे आणि सण कसा साजरा करायचा, असा गंभीर प्रश्न या कुटुंबासमोर उभा ठाकला आहे. संपूर्ण संसार डोळ्यांदेखत भस्मसात झाल्याचे पाहून मोरे कुटुंबीय हवालदिल झाले असून, त्यांनी शासनाकडे आर्थिक व निवाऱ्याची तातडीची मदत मिळण्याची मागणी केली आहे. --------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

AI Cancer Cure: पुढील १० वर्षांत कर्करोग इतिहासजमा होणार? अँथ्रोपिकच्या प्रमुखांची मोठी भविष्यवाणी

'बेसन लाडू to रसमलाई' वनिता खरातने दाखवली डाएटची कमाल; ट्रान्सफॉर्मेशनचा फोटो पाहून चाहते म्हणाले, 'तू कमाल आहेस!'

Sakal Lit Fest: सकाळ लिट फेस्ट 2026चा पुण्यात दिमाखदार प्रारंभ; बानू मुश्ताक, डॉ. अरुणा ढेरे यांच्या हस्ते उद्घाटन

Latest Marathi News Live Update : मनोज जरांगेंची मोठी घोषणा; मराठा बांधवांसाठी उपलब्ध करून दिल्या ३ हेल्पलाईन

Beed Crime: बीडमध्ये फटाका फेकण्याच्या वादातून चाकूहल्ला; पाच जण गंभीर जखमी, तिघांना अटक

SCROLL FOR NEXT