Illegal liquor and suspect seized from parking lot of Series Meadows building.
Illegal liquor and suspect seized from parking lot of Series Meadows building. esakal
नाशिक

Nashik Crime News : चंडीगडचा अवैध मद्यसाठा नाशिकमध्ये जप्त

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : चंडीगडमधून नाशिकमध्ये आणलेला अवैध मद्य साठा शहरातील गंगापूर रोड परिसरातील उच्चभ्रू इमारतीच्या पार्किंगमधून जप्त करण्यात आला. शहर गुन्हे शाखेच्या अमलीपदार्थविरोधी पथकाने केलेल्या कारवाईत एकाला अटक करण्यात आली आहे.

ओमनी वाहनासह मद्यसाठा असा सुमारे ३ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दरम्यान, यामागे मद्य तस्करांची मोठी साखळी असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. (Chandigarh illegal liquor stock seized in Nashik Crime News)

पद्‌मसिंग कैलास बजाड (३२, रा. सिंहस्थनगर, सिडको. मूळ रा. जऊळके, झोडगे, ता. मालेगाव) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. शहर गुन्हे शाखेच्या अमलीपदार्थविरोधी पथकाचे सहायक निरीक्षक हेमंत नागरे यांना गंगापूर रोड परिसरातील सिरीन मिडोजमधील प्रियांका ब्लॉसम या इमारतीच्या पार्किंगमध्ये अवैध मद्यसाठा आला असल्याची माहिती मिळाली होती.

त्यानुसार पथकाने रविवारी (ता. १९) रात्री पावणेबाराच्या सुमारास शिताफीने सापळा रचून छापा टाकला. सिरीन मिडोजमध्ये संशयित बजाड हा त्याच्या मालकीच्या ओमनी चारचाकी वाहनात (एमएच- १५- बीएक्स- ००८१) अवैधरीत्या मद्यसाठा ठेवत होता.

हेही वाचा : अदानी..हिंडेनबर्ग आणि भविष्य....

त्याचवेळी दबा धरून असलेल्या पथकाने छापा टाकून त्यात अटक केली व ३ लाख १७ हजार १०५ रुपयांचा विविध कंपन्याचा मद्य साठा जप्त केला. सदर मद्यसाठा चंडीगड येथील असून, तो नाशिकमध्ये आणला होता.

मद्यसाठा नाशिकमध्ये कसा आला, यामागील मद्य तस्करांची मोठी साखळी असून तिचा शोध घेण्यासाठी पथके नेमण्यात आली आहेत. याप्रकरणी गंगापूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून, सदर कामगिरी सहाय्यक पोलिस निरीक्षक हेमंत नागरे, अंमलदार रवींद्र दिघे, भारत डंबाळे, नितीन भालेराव, अनिरुद्ध येवले, बाळासाहेब नांद्रे, भाऊसाहेब कुटे, अविनाश फुलपगारे, योगेश सानप आणि चंद्रकांत बागडे यांनी केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT