नाशिक

गोदावरी सहकारी सेवा संस्थेतर्फे सभासदांना ८ टक्के लाभांश वाटप सुरू

CD
CHD26B04801 चांदोरी ः येथील गोदावरी संस्थेतर्फे सभासदांना लाभांश वाटप करताना सभापती संजय गायखे, संतू बस्ते. --------- ३६-२ गोदावरी सेवा संस्थेतर्फे ८ टक्के लाभांश वाटप शतक महोत्सवी सहकाराची परंपरा कायम --------- चांदोरी, ता.१७ : ग्रामीण भागातील सहकार चळवळीचा वारसा जपत शतक महोत्सव साजरा केलेल्या चांदोरी येथील गोदावरी सहकारी सेवा संस्थेतर्फे सभासदांना आठ टक्के लाभांश वाटपास शुक्रवारी (ता.१६) सुरवात झाली. शंभर वर्षांची परंपरा लाभलेल्या या संस्थेने लाभांश वाटपाच्या माध्यमातून सभासदांशी असलेले आर्थिक नाते अधिक दृढ करण्याचा प्रयत्न केला आहे. शतक महोत्सव साजरा केलेल्या संस्थेने सभासदांना आठ टक्के लाभांश वाटप सुरू केल्याने संस्थेच्या कामकाजातील सभासदांचे स्थान पुन्हा अधोरेखित झाले आहे. सहकारी संस्थेच्या वाटचालीत सभासदांचा विश्वास आणि सहभाग महत्त्वाचा असतो. सहकाराच्या माध्यमातून ग्रामीण भागातील आर्थिक व्यवहारांना बळ मिळावे, तसेच संस्थेची परंपरा पुढील काळातही कायम राहावी, अशी अपेक्षा या निमित्ताने व्यक्त होत आहे. लाभांश वाटपाप्रसंगी सभापती संजय गायखे, उपसभापती संतू बस्ते, सचिव अशोक डावखर, संचालक रघुनाथ टर्ले, बाळासाहेब आहेर, गणेश नाठे, नारायण सावंत, सोमनाथ खालकर, सुदाम भोज, अनिल भोर, काशिनाथ टर्ले, सत्यभामा कोरडे, लहानुबाई टर्ले आणि राजेंद्र हिरे उपस्थित होते. जिल्हा परिषद सदस्य सिद्धार्थ वनारसे, मविप्र संचालक शिवाजी गडाख, सरपंच विनायक खरात,संचालक शिरीष गडाख चांदोरीचे पोलीस पाटील अनिल गडाख यांच्यासह सभासद अमृता टर्ले, माणिक गायखे, निवृत्ती टर्ले, पुंडलिक गडाख, कचरू गडाख, रामदास गडाख, रामदास शेटे, शशिकांत कोरडे, समाधान टर्ले, अशोक वाघ, सोमनाथ लोंढे आणि अनुसयाबाई जमधडे उपस्थित होते. --------------

Political Earthquake : ऐन निवडणुकीच्या तोंडावर आणखी एका पक्षात उभी फूट! १२ पैकी ८ आमदार भाजपच्या गोटात; विधानसभेतील समीकरणे बदलली!

Vidhan Bhavan Row : विधानभवनात व्हिजिटर पासेसवरून मोठा वाद! उपसभापती सचिन अहिर आणि उपाध्यक्ष अण्णा बनसोडेंच्या अधिकारांना कात्री

Latest Marathi News Live Update : राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी : महसूलमंत्री बावनकुळे

IND vs WI 5th T20I: ५-५ षटकांचा सामना? पावसाचा धुमाकूळ... किती वाजता टॉस, मॅचची वेळ... घ्या जाणून Cut off टाईम...

VIDEO : सरप्राइज देण्यासाठी अचानक घरी पोहोचली लेक; आईची प्रतिक्रिया पाहून नेटकरीही भावूक

SCROLL FOR NEXT