नाशिक

गाव सोडले, पण गावपण नाही! चांदोरीकर पुन्हा एकवटणार आयुष प्रसाद यांची उपस्थिती

CD
पान-४ ॲंकर ---------- चांदोरीकरांतर्फे उद्या होणार ‘चांदोरी गाव दिवस’ ---------- जिल्हाधिकारींची उपस्थिती ः बैलगाड्यांची मिरवणूक, ‘चांदोरी भूषण’ पुरस्कार, बोहाड्याची पर्वणी ------------- सकाळ वृत्तसेवा चांदोरी, ता.१२ : नोकरी, व्यवसाय आणि शिक्षणानिमित्त गाव सोडून दूरवर स्थायिक झालेली माणसं पुन्हा एकदा गावाच्या मातीत रमावीत, जुन्या आठवणींना उजाळा मिळावा आणि नव्या पिढीला गावाच्या सांस्कृतिक वारशाची ओळख व्हावी, या भावनेतून चांदोरीत दुसऱ्या वर्षी ‘चांदोरी गाव दिवस’ साजरा करण्यात येणार आहे. चांदोरी गाव उत्सव समितीतर्फे शनिवारी (ता.१४) दिवसभर विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. सकाळी नऊला सजविलेल्या बैलगाड्या, शालेय विद्यार्थी आणि ग्रामस्थांच्या सहभागातून मारुती मंदिरापासून ग्रामफेरीला सुरुवात होईल. गणपती मंदिर, स्टँड, देवी मंदिर आणि सोमेश्वर मंदिरमार्गे ही मिरवणूक पुन्हा मारुती मंदिरात पोहोचेल. पारंपरिक वेशभूषा आणि गावच्या उत्सवी वातावरणातून चांदोरीच्या गावपणाचे दर्शन घडणार आहे. सकाळी दहाला पाहुण्यांचे स्वागत तर साडेदहाला ‘आठवणीतील गाव’ प्रदर्शनाचे उद्घाटन होईल. मुख्य सोहळ्यात स्पर्धा परीक्षा, सरळ सेवा भरती तसेच देशसेवेत निवड झालेल्या गुणवंतांचा ‘चांदोरी भूषण पुरस्कार’ देऊन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या हस्ते गौरव करण्यात येणार आहे. गावाबाहेर जाऊन उद्योजक म्हणून स्वतःची ओळख निर्माण करणाऱ्या चांदोरीच्या भूमिपुत्रांचाही सन्मान होणार आहे. दुपारी बाराला ‘आठवणीतील गाव’ या उपक्रमातून गावात आणि बाहेरगावी स्थायिक झालेल्या चांदोरीकरांना आपल्या आठवणी, अनुभव आणि जुन्या गप्पा मांडण्याची संधी मिळणार आहे. कृष्ण मंदिर, हिंगणे चौक येथे स्नेहभोजनानंतर दुपारी अडीच ते पाच हा वेळ गावातील जुन्या परिचित ठिकाणांना भेटी देण्यासाठी आणि मित्रपरिवाराच्या भेटीगाठींसाठी राखीव असेल. सायंकाळी साडेपाचला जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. डी. एस. स्वामी यांच्या हस्ते सांस्कृतिक कार्यक्रमांचा शुभारंभ होणार असून, पारंपरिक बोहाडा हे विशेष आकर्षण असेल. सायंकाळी साडेसातला गंगा-गोदावरी महाआरतीने उत्सवाची सांगता होईल. गावातून बाहेर पडलेली माणसे पुन्हा गावात परततात, तेव्हा केवळ भेटीगाठी होत नाहीत, तर आठवणींचा एक गाव पुन्हा जिवंत होतो. गावाशी असलेली हीच नाळ अधिक घट्ट करण्याचा प्रयत्न ‘चांदोरी गाव दिवस’च्या माध्यमातून केला जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kimberly Powell: कोण आहेत एनव्हिडियाच्या सीईओची 'विकेट' घेणाऱ्या किंबर्ली पॉवेल? इंटर्न ते थेट कंपनीच्या उपाध्यक्षा

Nvidia CEO Exit: ३३ वर्षांच्या प्रवासाला २ अफेअर्समुळे 'ब्रेक'! जगातील बलाढ्य कंपनीच्या सीईओचा तडकाफडकी राजीनामा; एआय जगताला हादरा

Khopoli Bus Accident : बाजारपेठेत अर्धा किलोमीटर मृत्यूचा थरार! अनियंत्रित बसने अनेक वाहनांना उडवले; एका तरुणाचा करुण अंत!

Latest Marathi News Live Update : सातारा जिल्हा बँक अध्यक्ष निवडीच्या राजकारणात मोठी घडामोडी; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे 'दरे' गावी निघताच मंत्री शिवेंद्रसिंहराजेंनी घेतली भेट

AI Cancer Cure: पुढील १० वर्षांत कर्करोग इतिहासजमा होणार? अँथ्रोपिकच्या प्रमुखांची मोठी भविष्यवाणी

SCROLL FOR NEXT