Chandrakantada More while guiding the servants in the cleanliness campaign esakal
नाशिक

Chandrakant More : राष्ट्रसंत तुकडोजी संत गाडगेबाबांचा वारसा पुढे नेत आहेत गुरुमाउली : चंद्रकांतदादा मोरे

सकाळ वृत्तसेवा

Chandrakant More : राष्ट्रसंत तुकडोजी, संत गाडगेबाबांनी आपलं आयुष्य समाजाला अंधश्रद्धेच्या जोखडातून मुक्त करण्यासाठी खर्ची घातले.

स्वच्छता आणि आरोग्याचा मंत्र निरक्षर, अडाणी, अज्ञानी जनतेला देण्यासाठी आयुष्यभर या महात्म्यांनी अखंडित पायपीट करून जनजागृती केली.

अत्यंत साध्यासोप्या, सामान्य माणसाला समजेल अशा भाषेत जनप्रबोधन केले. गुरुमाउली आज खऱ्या अर्थाने हा वारसा पुढे घेऊन जात आहेत, असे गौरवोद्गार चंद्रकांतदादा मोरे यांनी काढले. (Chandrakant dada More statements about Gurumauli is carrying forward legacy of Rashtrasant Tukdoji Sant Gadge Baba nashik news)

अखिल भारतीय श्री. स्वामी समर्थ गुरुपीठ त्र्यंबकेश्वर अंतर्गत आरोग्य अभियानाच्या अंतर्गत नाशिक रामतीर्थ परिसर, त्र्यंबकेश्वर कुशावर्त परिसरासह गेले वर्षभर देशभरातील सेवाकेंद्रांच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या स्वच्छता अभियानाबाबत माहिती देताना त्यांनी वरील उदगार काढले.

गत गुरुपौर्णिमेपासून स्वच्छता अभियान, गरजूंना वस्त्रदान, आरोग्य तपासणी आणि मोफत औषधोपचाराचा संयुक्त कार्यक्रम हाती घेण्यात आला. वर्षभर हा उपक्रम अखंडितपणे सुरू आहे. या अभियानात नाशिक जिल्ह्यातील महिला- पुरुष सेवेकऱ्यांनी सहभाग नोंदवला तसेच राज्य व राज्यबाहेर सुद्धा सेवेकऱ्यांनी आपापल्या गावातील नदी, मंदिरे यांची स्वच्छता केली.

याला जोडूनच गरीब, गरजूंना वस्त्रदान, गरजू रुग्णांची मोफत आरोग्य तपासणी आणि औषधं वाटप असा संयुक्त कार्यक्रम राबविण्यात आला. गोदावरी जेथे उगम पावते ते तिर्थक्षेत्र त्र्यंबकेश्वर पासून ती समुद्रास मिळते तेथे म्हणजे राजमहेंद्री, आंध्र प्रदेशपर्यंत हे स्वच्छता अभियान गुरुमाउलींच्या आदेशानुसार गेले वर्षभर सातत्याने महिन्यातील तिसऱ्या रविवारी राबविण्यात येत असल्याची माहिती चंद्रकांतदादा मोरे यांनी दिली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

अखिल भारतीय श्री. स्वामी समर्थ सेवामार्ग आणि समर्थ गुरुपीठाच्या वतीने मार्च महिन्यात जनसेवा पंधरवडा आयोजित करण्यात आला होता. अष्टविनायक, सर्व ज्योतिर्लिंग, शक्तिपीठे, दत्तपीठे यासह गावागावातील ग्रामदेवता व इतर मंदिरे याठिकाणी स्वच्छता, आरोग्यशिबिरे, अन्नदान, वस्त्रदान, विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप यासह विविध आध्यात्मिक सेवेचे आयोजन मोठ्या प्रमाणात करण्यात आले.

चारही शक्तिपिठांवर त्या- त्या विभागातील महिला पुरुष सेवेकऱ्यांनी दुर्गासाप्तशती तर सर्व दत्तपिठांवर श्री. गुरुचरित्र पारायण तर ज्योतिर्लिंग स्थानी रुद्र पठण केले. पंधरवड्यात ९२ हजार सेवेकऱ्यांनी गणपती अर्थर्वशीर्ष वाचन केले, ५० हजार दुर्गासाप्तशती व श्रीगुरुचरित्र पारायण, तर जवळपास एक लाख सेवेकऱ्यांनी रुद्र सेवेत सहभाग नोंदवला.

सव्वादोन लाख विद्यार्थ्यांना शालोपयोगी साहित्य वाटप तर ८१ हजार गरजूंना वस्त्रवाटप करण्यात आले. हजारो केंद्राच्या माध्यमातून दोन लाख नागरिकांना आरोग्य शिबिरात मोफत औषधी वाटपाचा लाभ झाला, अशी माहितीही चंद्रकांतदादा मोरे यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India reaction to Sheikh Hasina death sentence : बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या फाशीच्या शिक्षेवर भारताची पहिली प्रतिक्रिया!

Kagal Nagarparishad Election : हसन मुश्रीफ-समरजित घाटगे एकत्र; कागल नगरपरिषद बिनविरोध करण्याचा संकल्प

राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे अर्ज भरायला जाताना ‘या’ उमेदवारास १०० पोलिसांचा बंदोबस्त; पहाटे ५.३० वाजता उमेदवार नगरपंचायतीत, अनगरची बिनविरोधाची ६५ वर्षांची परंपरा खंडीत

Ladki Bahin Yojana eKYC Deadline Extension: मोठी बातमी! लाडक्या बहिणींना सरकारकडून दिलासा; अखेर eKYC साठी जाहीर केली मुदतवाढ

Crime: सासरा आणि सूनेचं प्रेम जडलं; अडसर ठरणाऱ्या मुलाचा काटा काढला, मात्र एका चुकीनं बाप पोलिसांच्या जाळ्यात अडकला

SCROLL FOR NEXT