Chandrakant Dada More while distributing clothes to the needy during cleanliness campaign.  esakal
नाशिक

Chandrakantdada More : प्रदूषणमुक्त तीर्थक्षेत्र हे गुरुमाउलींचे स्वप्न : चंद्रकांतदादा मोरे

सकाळ वृत्तसेवा

Chandrakantdada More : देशभरातील तीर्थक्षेत्रीच असलेली नव्हे तर गावागावातील मंदिरे ही आपली ऊर्जास्थळे आणि मनाला धीर देणारी केंद्र आहेत. (Chandrakant More statement pollution free pilgrimage site is Gurumauli dream nashik news)

या पवित्र ठिकाणी स्वच्छता, शांतता, शिस्त असेल तर तेथील पावित्र्य टिकून राहणार आहे आणि या ठिकाणी येणाऱ्या भाविकास खरा आनंद, मनःशांती मिळणार आहे, अशी गुरुमाउली आण्णासाहेब मोरे यांची भूमिका असल्यामुळेच त्यांच्या आदेशान्वये आपण स्वच्छता आणि त्यास जोडून आरोग्य तपासणी, अन्न, वस्त्रदान अभियान हाती घेतले आहे. या अभियानात सहभागी होऊन आपण खारीचा वाटा उचलावा, असे आवाहन श्री. स्वामी समर्थ गुरुपीठाचे महाव्यवस्थापक चंद्रकांतदादा मोरे यांनी येथे केले.

समर्थ गुरुपीठाच्या वतीने राज्यभरातील तीर्थक्षेत्र, नदी, तलाव मंदिरे अशा ठिकाणी स्वच्छता करण्याची मोहीम गत गुरुपौर्णिमेपासून हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेंतंर्गत गंगागोदावरी परिसर महिन्यातून एक रविवारी अखंडितपणे स्वच्छता करीत आहेत.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

या सोबतच गरजू रुग्णांची तपासणी करून मोफत औषधोपचार आणि गरजूंना वस्त्रदान करण्यात येते. या निमित्ताने गंगाघाट परिसरातील बालाजी कोट श्री. स्वामी समर्थ केंद्रात उपस्थित सेवेकऱ्यांशी संवाद साधताना चंद्रकांतदादा मोरे यांनी हे आवाहन केले.

या मोहिमेसाठी शहरातील वेगवेगळ्या समर्थ केंद्रांमधून उपस्थित अडीचशे महिला पुरुष सेवेकऱ्यांशी संवाद साधताना मोरे पुढे म्हणाले ‘ही श्रमदान सेवा मनाला, शरीराला निरोगी, संयमित बनविण्यासाठी आपण हाती घेतली आहे. सद्‌गुरू पिठले महाराज यांची ही तपोभूमी तर गाडगे बाबांची कर्मभूमी हा गोदाकाठ आहे. या पावनभूमीत आपणास सेवा करण्याची संधी मिळते आहे, ही मोठी भाग्याची गोष्ट आहे.’

पंधरा गोणी कचऱ्यांचे संकलन

सेवेकऱ्यांनी १०/१५ च्या गटागटाने वेगवेगळ्या ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवून पंधरा गोणी कचरा जमा केला. ४५ गरजूंना वस्त्रदान करण्यात आले तर ९० रुग्णांची तपासणी करून औषधी वाटप झाले. येथील स्थानिक केंद्रातील सेवेकरी आणि आरोग्य अभियान प्रतिनिधी तसेच सेवामार्गाचे जिल्हा प्रतिनिधी घोडेराव यांनी विशेष परिश्रम घेतले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : आम्ही एकत्र आलो ते एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे

Raj Thackeray: निळा मफलर.. डोळ्यांवर गॉगल! राज ठाकरेंच्या 'लूक'मध्ये राजकीय संदेश? अमित ठाकरेही निळ्या शर्टवर

Raj Thackeray: जे बाळासाहेबांना जमलं नाही ते फडणवीसांनी करून दाखवलं, राज ठाकरेंनी सांगितलं एकत्र येण्याचं कारण

मोठी बातमी! राज ठाकरेंना आव्हान देणाऱ्या सुशिल केडियांचं ऑफीस मनसैनिकांनी फोडलं, पाहा VIDEO

Video : "वारी चुकली, पण विठ्ठल भेटला" हॉस्पिटलमध्ये घडली हृदयस्पर्शी घटना; व्हायरल व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील..

SCROLL FOR NEXT