Chandrakant Dada Patil : राज्यातील गुन्हेगारी घटना चिंताजनक असून, यासंदर्भात राज्य सरकार सतर्क आहे. अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांना आलेल्या धमकीबाबत दखल घेण्यासाठी सरकार सक्षम आहे.
मात्र राज्यात सध्या जे चाललंय ते अनाकलनीय आहे, सर्व पक्षांनी याचा विचार करण्याची गरज असल्याचे राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. (Chandrakant Patil statement on What is happening in state is incomprehensible nashik news)
श्री. पाटील नाशिक दौऱ्यावर आले असता त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. राज्यात गोळीबाराच्या घटना चिंताजनक असल्याचे सांगून ते म्हणाले, की यासंदर्भात योग्य स्तरावर चौकशी व कारवाई होत आहे. श्री. भुजबळ यांना ठार करण्याची धमकी देण्यात आली. नाशिक कार्यालयात पत्र पाठवून ठार करण्याची सुपारी घेतल्याची माहिती दिली आहे.
यावर राज्यात सध्या जे सुरू आहे, ते अनाकलनीय आहे. कुठेतरी शांतपणे सर्व पक्षांनी याचा विचार जरूर करावा. भुजबळ यांना आलेल्या धमकीची सरकारने दखल घेतली असून, चाळीसगाव येथील गोळीबार प्रकरणाबाबत अपुऱ्या माहितीवर बोलणे योग्य नसल्याचे त्यांनी सांगितले.
वरिष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्या वाहनावर शुक्रवारी पुण्यात हल्ला झाला, त्यावर पाटील यांनी पंतप्रधानांबाबत खालच्या पातळीवर जाऊन ते बोलले तर त्यांच्यावर श्रद्धा असलेल्या माणसांकडून प्रतिक्रिया उमटणे स्वाभाविक आहे. वागळेंनीही नागरिकांचा संताप लक्षात घेऊन व्यवस्थित बोलावे, बोलण्याची काहीतरी पद्धत आहे हे लक्षात ठेवावे.
जरांगे-पाटील यांच्या मागणीचा कुणबी नोंदीचा मुद्दा मार्गी लागला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी मागासवर्ग आयोग काम करत आहे. त्यामुळे जरांगे-पाटील यांनी उपोषणाला बसण्याची आवश्यकता नसल्याचे ते म्हणाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.