State president Chandrasekhar Bawankule speaking at the inauguration of BJP office. Neighbor MLA Adv. Rahul Dhikle, Keda Aher, former House leader Dinkar Patil, Tanuja Gholap etc. esakal
नाशिक

Chandrashekhar Bawankule News : बबनराव घोलप यांच्यासाठी भाजपचे दार केव्हाही खुले : बावनकुळे

सकाळ वृत्तसेवा

Chandrasekhar Bawankule News : देवळाली विधानसभा मतदारसंघात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या सय्यद पिंप्री गावात भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शिवसेनेचे उपनेते बबनराव घोलप यांना पक्षाचे दार खुले असल्याचे सांगत पक्षात येण्याचे थेट आवतन दिले.

त्यामुळे भाजपकडून शिवसेनेच्या ठाकरे गटाला पुन्हा एकदा नाशिकमध्ये सुरुंग लावण्याचे प्रयत्न होत असल्याचे मानले जात आहे. (chandrashekhar bawankule statement about baban gholap nashik news)

श्री. घोलप यांच्या कन्या व भाजपच्या तनुजा घोलप-भोईर यांच्या सय्यद पिंप्री येथील संपर्क कार्यालयाचे उद्‌घाटन श्री. बावनकुळे यांच्या हस्ते झाले, त्या वेळी त्यांनी घोलप यांच्यासंदर्भात प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, की घोलप आमच्याकडे आले तर आम्ही त्यांना नाही म्हणणार नाही. हा निर्णय घोलप यांनी घ्यायचा आहे.

आम्ही कुणाला आमच्या पक्षात या, असे म्हणत नाही. श्री. घोलप यांचे पुत्र योगेश यांनी काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांची मुंबईत भेट घेतली.

बबनराव घोलप यांनीही वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली.

घोलप यांच्या नाराजीच्या पार्श्वभूमीवर श्री. बावनकुळे यांनी घोलप यांच्या कन्या तनुजा यांच्या सय्यद पिंप्री येथील जनसंपर्क कार्यालयाच्या उद्‌घाटनाचे निमित्त साधून घोलप यांना अप्रत्यक्ष भाजपमध्ये येण्याचे निमंत्रण दिल्याचे बोलले जात आहे. कार्यक्रमास पूर्व विधानसभा मतदारसंघाचे आमदार ॲड. राहुल ढिकले, तसेच ‘मविप्र’चे अध्यक्ष डॉ. सुनील ढिकले उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nehal Modi: नीरव मोदीचा भाऊ नेहल मोदीला अटक; पंजाब नॅशनल बँक घोटाळाप्रकरणी मोठी कारवाई, पुढील कारवाई काय?

IND vs ENG 2nd Test: रिषभ पंतची ट्वेंटी-२० स्टाईल फटकेबाजी! इंग्लंडच्या गोलंदाजांची धुलाई करून रचला इतिहास, चेंडूसह बॅटही हवेत...

Sanaswadi Fire : इंडिका कंपनीला आग! संपूर्ण गावात आग आणि धूर, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

Sunil Tattkare : महाराष्ट्राची आर्थिक स्थिती उत्तम; निधी वाटपावरून तटकरेंनी फेटाळले कुरबुरीचे आरोप

Badlapur Firing Case : बदलापूर फायरिंगमधील देशी पिस्तूल, मोटरसायकल हस्तगत; एकाला अटक

SCROLL FOR NEXT