नाशिक

चांदसैली येथे महिला बचत गटांना अर्थसहाय्य मंजूर

CD
NSK26H34989 चांदशैली : महिला बचत गटांना अर्थसहाय्य वाटप करताना. --- चांदसैलीत महिला बचत गटांना दहा हजारांचे अर्थसहाय्य मंजूर नंदुरबार, ता. १४ : क्रांतिसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त आयोजित ‘जनजातीय गौरव दिन सेवा सप्ताहांतर्गत चांदसैली (ता. शहादा) येथे लाभ वितरण मेळावा झाला. यात राणी दुर्गावती महिला सक्षमीकरण योजनेंतर्गत स्थापन करण्यात आलेल्या सात महिला बचत गटांना प्रत्येकी दहा हजारांचे अर्थसहाय्य मंजूर करण्यात आले. त्यासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून घेण्यात आली. चांदसैली ग्रामपंचायतीत आयोजित या मेळाव्यात न्यूक्लिअस बजेट योजनेंतर्गत निवड झालेल्या पात्र लाभार्थ्यांकडून धनादेश वितरणासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून घेण्यात आली. तसेच आदिवासी विकास विभागाच्या केंद्रवर्ती अर्थसंकल्प योजनांसह विविध शासकीय योजनांची माहिती देण्यात आली. आदिवासी विकास विभाग आणि महाराष्ट्र ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद) यांच्या संयुक्त प्रयत्नातून चांदसैली गावातील आदिवासी महिलांच्या १०० टक्के सहभागातून सात महिला बचत गटांची स्थापना करण्यात आली. या बचत गटांना आदिवासी विकास विभागाच्या केंद्रवर्ती अर्थसंकल्पांतर्गत राणी दुर्गावती महिला सक्षमीकरण योजनेंतर्गत प्रत्येकी दहा हजारांचे अर्थसहाय्य मंजूर करण्यात आले आहे. या अनुषंगाने मेळाव्यात आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करण्यात आली. मेळाव्यास बचत गटांमधील सुमारे ७० महिला, तसेच पुरुष उपस्थित होते. या वेळी आदिवासी विकास विभागाचे प्रतिनिधी आणि तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार यांनी उपस्थितांना आदिवासी विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध शासकीय योजना, तसेच केंद्रवर्ती अर्थसंकल्प योजनेची माहिती दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

8th Pay Commission: फिटमेंट फॅक्टर कमी असला तरी 'या' एका निर्णयामुळे पगारात होणार मोठी वाढ; आठव्या वेतन आयोगाचं सोपं गणित

SMAT 2026: वैभव सूर्यवंशीचा कर्णधार म्हणून वर्ल्ड रेकॉर्ड! पण, संघ नाही जिंकला; वाचा बिहारचा कोणी करेक्ट कार्यक्रम केला

बाबो! अभिनेत्री ऋतुजाने अवघ्या ४ महिन्यांत घटवलं तब्बल इतकं वजन; ट्रान्सफॉर्मेशनचे फोटो पाहून नेटकरी म्हणाले...

Thane News: २ तासांचा प्रवास २० मिनिटांत पूर्ण होणार, ठाण्यात नवा पूल उभारणार; एमएमआरडीएचा ९७५.५८ कोटींचा प्लॅन

Latest Marathi News Live Update: मायक्रो फायनान्स कंपनीवर कारवाई होणार- संजय राठोड

SCROLL FOR NEXT