सैन्याविरोधात चिथावणीखोर वक्तव्य;
बडतर्फे जवान चंदू चव्हाणविरोधात गुन्हा
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. २९ : भारतीय सैन्य दलातून बडतर्फ करण्यात आलेले असतानाही सोशलमीडियाच्या माध्यमातून भारतीय सैन्याची बदनामी करणे, बडतर्फ असताना सैन्याचा गणवेश परिधान करण्यास मनाई असतानाही गणवेश परिधान करून सैन्यदलाविषयी नागरिकांमध्ये गैरसमज निर्माण होईल असे वक्तव्य करणे, तसेच सैन्यातील जवानांमध्ये बंड घडवून आणण्यासाठी त्यांचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करणाऱ्या बडतर्फ जवान चंदू चव्हाण याच्या विरोधात देवळाली कॅम्प पोलिसात गुन्हा दाखल झाला.
आर्टिलरी वर्कशॉपचे नायब सुभेदार सचिन गंगाधर गुंजाळ (३९, रा. देवळाली कॅम्प) यांच्या फिर्यादीनुसार, चंदू चव्हाण यास सैन्यदलातून बडतर्फ करण्यात आलेले आहे. तरीही त्याने ११ सप्टेंबर २०२६ ते २२ सप्टेंबर २०२६ व २९ सप्टेंबर २०२६ रोजी सैन्यदलाविषयी खोटी व बदनामीकारक व्हिडिओ सोशलमीडियावर पोस्ट केले आहेत.
बडतर्फ केल्यानंतर जवानाला सैन्यातील जवानाला गणवेश परिधान करण्यास मनाई असताना संशयित चंदू हा गणवेश परिधान करून सोशलमीडियावरून लष्करी, निमलष्करी दलातून बडतर्फ जवानांनी संघटना तयार करण्याचे आवाहन करतो. बडतर्फ जवान चंदू चव्हाण याच्याविरोधात गेल्या वर्षी मे २०२५ मध्ये देवळाली कॅम्प पोलिसात याच स्वरूपाचा गुन्हा दाखल आहे. याप्रकरणी त्यास जुलै २०२५ मध्ये अटकही करण्यात आली होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.