नाशिक

चांदवडमध्ये उभी राहणार प्रशासकीय इमारत

CD
फक्त शहरासाठी आहे.. -------------- चांदवडमध्ये उभी राहणार प्रशासकीय इमारत जिल्हा प्रशासन : भगूरसह विविध ठिकाणी विकासकामांना मंजुरी सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. ७ : आनंदपर्व दिवाळी सणानिमित्ताने जिल्हा प्रशासनाने विविध विकासकामांना प्रशासकीय मान्यता दिली आहे. चांदवडमध्ये ७ कोटी रुपये खर्च करून प्रशासकीय इमारत उभारण्यात येणार आहे. भगूरला इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिंग स्टेशनसह जिल्ह्याभरातील निरनिराळ्या विकासकामांना मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे जिल्हावासीयांचा आनंद द्विगुणित झाला आहे. राज्य सरकारच्या नगरविकास विभागाच्या निर्णयानुसार ''नगरपरिषदांना वैशिष्ट्यपूर्ण कामांसाठी विशेष अनुदान'' या योजनेंतर्गत चांदवड नगरपरिषदेच्या प्रशासकीय इमारतीसाठी सात कोटींची तरतूद करण्यात आली आहे. या कामासाठी सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभागाकडून ६ कोटी ९९ लाख १४ हजार ७१८ रुपये इतक्या रकमेची तांत्रिक मान्यता प्राप्त झाली आहे. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची जन्मभूमी असलेल्या भगूरला नगरपरिषदेच्या मालकीच्या जागेत इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिंग स्टेशन उभारण्यात येईल. तसेच महिला कौशल्य विकास केंद्र, हिरकणी केंद्र, सार्वजनिक शौचालय, वॉटर एटीएम आणि पर्यटनाच्या दृष्टीने व्ह्यू पॉइंट तसेच सेल्फी पॉइंटचा प्रस्ताव आहे. या विविध विकासकामांसाठी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी एकूण ९९ लाख ९९ हजार ८१६ रुपयांचा प्रशासकीय कामांना मान्यता दिली आहे. --- विठेवाडीत वीज पायाभूत सुविधा देवळा तालुक्यातील विठेवाडी (लो) येथे सुधारित वितरण क्षेत्र योजनेतंर्गत प्रस्तावित ३३/११ केव्ही वीज उपकेंद्र प्रस्तावित होते. या उपकेंद्रासाठी विठेवाडी येथील गट क्रमांक २९० मधील ०.६० हेक्टर शासकीय जमीन महावितरणला ३० वर्षांच्या भाडेपट्ट्याने नाममात्र वार्षिक १ रुपया दराने मंजूर करण्यात आली आहे. --- कळवणमध्ये जॉगिंग ट्रॅक कळवण नगरपंचायत हद्दीतील जॉगिंग ट्रॅकच्या कामाला जिल्हाधिकाऱ्यांनी सुधारित प्रशासकीय मान्यता दिली आहे. त्यामुळे शहरातील तरुणांना धावण्याच्या सरावासाठी हक्काची व सुरक्षित जागा उपलब्ध होईल. वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत सन २०२३-२४ मध्ये दिंडोरी नगरपंचायतीसाठी ३ कोटी रुपये, तर कळवण नगरपंचायतीसाठी ७ कोटी असा एकूण १० कोटींचा निधी मंजूर करण्यात आला होता. या योजनेनुसार प्रकल्प खर्चाचा १०० टक्के हिस्सा शासनाकडून उपलब्ध करून दिला जाईल. ------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अमेरिकेत खळबळ! पत्नीने AIच्या मदतीने रचला पतीच्या हत्येचा कट? ChatGPTच्या विरोधात खटला दाखल

यंदाची दिवाळीही सीमेवरील जवानांसोबत! पंतप्रधान मोदींनी देशवासीयांना दिल्या खास शुभेच्छा, पाहा VIDEO

Devendra Fadnavis : 'गोकुळ'वर ताबा मिळवण्याचा प्रश्नच नाही! CM फडणवीसांनी सांगितलं संचालक नेमण्यामागचं नेमकं कारण

Latest Marathi News Live Update: पार्थ पवार शरद पवारांच्या भेटीसाठी सिल्व्हर ओकवर दाखल

Rohit Pathare case : २४ वर्षीय रोहित पठारेला घरातून उचललं, झाडाला बांधून बेदम मारहाण; उपचारादरम्यान मृत्यू

SCROLL FOR NEXT