नाशिक

सराईत मोटारसायकल चोरटा गजाआड !

CD
पान दोन -------------------- चांदवडमधून सराईत दुचाकी चोरट्यास अटक सकाळ वृत्तसेवा गणूर, ता. ६ : चांदवड बाजार समितीच्या आवारातून दुचाकी चोरी प्रकरणी चांदवड पोलिसांनी मालेगाव येथील तौहीद अहमद एजाज अहमद अन्सारी (वय ३०) यास अटक केली. चांदवड येथील सौरभ महेंद्र मुथा यांची दुचाकी (एमएच १५ जीएस ६९३१) ३१ ऑक्टोबरला नामको बँकेसमोरील बाजार समितीच्या आवारातून चोरीला गेली होती. याप्रकरणी पोलिस गुन्हा दाखल करण्यात आला होता. उपविभागीय पोलीस अधिकारी रोशन पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अभिजीत सोनवणे यांनी तपासासाठी पथक नियुक्त केले होते. दरम्यान, राहुड घाट परिसरात पेट्रोलिंग करत असताना पोलिसांना विना नंबरची दुचाकी भरधाव जाताना दिसली. पोलिसांनी हॉटेल स्वामी प्राईडजवळ पोलिसांनी चालकाला थांबवून वाहनाच्या कागदपत्रांची विचारणा केली. मात्र, त्याने समाधानकारक उत्तरे न दिल्याने त्याला पोलिस ठाण्यात आणून चौकशी करण्यात आली. चौकशीत त्याने आपले नाव तौहीद अहमद एजाज अहमद अन्सारी (रा. शहाबानपुरा, मालेगाव) असे सांगितले. तसेच ही दुचाकी मालेगाव येथील साहिद उर्फ काल्या याच्यासोबत मिळून चांदवड बाजार समितीतून चोरी केल्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी त्यास दुचाकीसह ताब्यात घेतले. पोलिस निरीक्षक अभिजीत सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली सचिन राऊत, प्रदीप आजगे, प्रदीपसिंग सोळंकी, विक्रम बस्ते आणि भूषण साळवे यांनी ही कारवाई केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: मुंबईत इमारतीच्या २३व्या मजल्यावर भीषण आग! दिवाळीच्या रॉकेटने आग लागल्याचा संशय

AI Safety: एआयला अधिकार देण्याची घाई करू नका; अन्यथा मोठे संकट अटळ! कोणी दिला धोक्याचा इशारा?

YouTube Tutorials Fake Currency Racket : यूट्यूबवरील व्हिडिओ पाहून छापल्या चक्क ६.७८ कोटींच्या बनावट नोटा! नंतर स्वतःच 'पोलीस' बनून लोकांना लुटलं; धक्कादायक प्रकार उघडकीस

Vaibhav Chavan Case news: वैभव चव्हाणला जीवाची भीती होती? मृत्यूपूर्वीच्या दोन ऑडिओ क्लिप्समुळे खळबळ!

Latest Marathi News Update : जाणून घ्या दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी

SCROLL FOR NEXT