Traffic Police esakal
नाशिक

Nashik Traffic Management: शहरातील वाहतूक मार्गात बदल; उलगुलान मोर्चामुळे वाहतूक शाखेचे नियोजन

सकाळ वृत्तसेवा

Nashik Traffic Management : अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या वतीने गुरुवारी (ता.१२) उलगुलान मोर्चा काढण्यात येणार आहे. त्या पाशर्वभूमीवर शहर पोलीस वाहतूक शाखेतर्फे मोर्चा मार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे.

त्यामुळे शहराच्या मध्यवर्ती भागात येणार्यांनी पर्यायी मार्गांचा अवलंब करण्याचे आवाहन वाहतूक शाखेतर्फे करण्यात आले आहे. (Changes in traffic routes in city Planning of Transport Branch due to Ulgulan Morcha nashik)

अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या उलगुलान मोर्चामध्ये जिल्हाभरातून लाखभर आदिवासी बांधव सहभागी होणार आहेत. या मोर्चामुळे शहरात वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे.

त्यापार्श्वभूमीवर शहर वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त चंद्रकांत खांडवी यांनी अधिसूचना जारी करीत वाहतूक मार्गात बदल केलेले आहे. मोर्चाला सकाळी अकरा वाजता सुरू होणार असून, मोर्चा संपेपर्यंत वाहतूक मार्गातील बदल कायम राहणार आहे.

कडेकोट पोलीस बंदोबस्त

आदिवासी मोर्चासाठी परिमंडळ एक अंतर्गत कडेकोट पोलीस बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आले आहे.

पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली तीन सहायक आयुक्त, सरकारवाडा, मुंबई नाका, भद्रकाली, पंचवटी पोलीस ठाण्यांचे वरिष्ठ पोलीस निरीक्षकांसह अधिकारी-कर्मचार्यांसह कडेकोड बंदोबस्त आहे.

तसेच वाहतूक नियोजनसाठी सहायक आयुक्त सचिन बारी यांच्या नेतृत्त्वाखाली वाहतूक पोलीस अधिकारी-कर्मचारी सज्ज असणार आहेत.

हे मार्ग बंद

* रविवार कारंजा ते सांगली बँक - नेपाळी कॉर्नर - शालिमार - शिवाजी रोड - सीबीएस सिग्नल ते जिल्हाधिकारी कार्यालय - मेहेर सिग्नल या मार्गांवर सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद.

पर्यायी मार्ग

* मालेगाव स्टॅण्डकडून रविवार कारंजाकडे येणारी वाहतूक मालेगाव स्टॅण्डकडून मखमलाबाद नाका - बायजाबाई छावणीकडून जाणारी वाहतूक रामवाडीमार्गे चोपडा लॉन्सकडून मार्गस्थ

* सारडा सर्कलकडून खडकाळी सिग्नलकडे येणारी वाहतूक मोडक सिग्नलमार्गे जलतरण तलाव सिग्नलकडून मार्गस्थ

* मुंबई नाकाकडून येणारी वाहतूक मोडक सिग्नलमार्गे जलतरण तलाव सिग्नलमार्गे मार्गस्थ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pak Rapper Indian Flag : पाक रॅपरने शो मध्ये फडकवला 'तिरंगा'! पाकिस्तानात संतापाची लाट, व्हिडिओ व्हायरल, काय घडलं नेमकं?

WPL 2026 Date: मोठी बातमी! महिला प्रीमियर लीग २०२६ कधीपासून सुरू होणार? तारीख आली समोर

नॅशनल क्रश झाल्यानंतर दोन दिवसात गिरीजा ओकचे किती फॉलोवर्स वाढले? आकडा वाचून भुवया उंचावतील

१० वी पास...१० वर्षांचा प्रिटिंगचा अनुभव...YouTube बघून तयार केल्या बनावट नोटा अन्...; पठ्ठ्याची करामत वाचून व्हाल थक्क

Mumbai News: मुंबईला जागतिक दर्जाचे टनेल मत्स्यालय मिळणार! कुठे अन् कधी पूर्ण होणार? बीएमसीने संपूर्ण योजना सांगितली

SCROLL FOR NEXT