नाशिक

चाळीसगावला वक्तृत्व स्पर्धा उत्साहात

CD
ॲंकरसाठी बातमी... चाळीसगाव ः वक्तृत्व स्पर्धेतील विजेत्यांसोबत विजयकुमार ठाकूरवाड, डॉ. मुकुंद करंबेळकर, सुजाता अवचट, राजेश ठोंबरे, भूषण पाठक, अण्णा धुमाळ आदी. चाळीसगावला वक्तृत्व स्पर्धा उत्साहात ऐश्वर्या पाटील व अनुषा अहिरे यांना प्रथम क्रमांक प्राप्त सकाळ वृत्तसेवा चाळीसगाव, ता. २ ः येथील शेठ नारायण बंकट वाचनालयाच्या यत्नदर्शिका विभागातर्फे घेण्यात आलेल्या स्वर्गीय देव आंतर महाविद्यालयीन व शालेय विद्यार्थ्यांसाठी स्वर्गीय प्रा. मंदाताई देव व डॉ. श्यामकांत देव स्मृती करंडक वक्तृत्व स्पर्धेत महाविद्यालय गटात ऐश्वर्या पाटील (एम. जे. कॉलेज जळगाव) तर शालेय गटात अनुषा संदीप अहिरे (डॉ. काकासाहेब पूर्णपात्रे विद्यालय, चाळीसगाव) यांनी प्रथम क्रमांक प्राप्त केला. स्पर्धेचे उद्घाटन वाचनालयाचे अध्यक्ष डॉ. मुकुंद करंबेळकर यांच्याहस्ते झाले. यावेळी परीक्षक मुकेश पवार यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धेच्या अटी व नियम समजावून सांगितल्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संचालक दीपक देशपांडे यांनी केले. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील जळगाव, धुळे, नंदुरबार या जिल्ह्यातील कनिष्ठ आणि वरिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी व स्थानिक शाळेतील असे एकूण ४४ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. बक्षिस वितरण सोहळ्याला उपविभागीय पोलिस अधिकारी विजयकुमार ठाकूरवाड प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. समितीचे निमंत्रण प्रा. मधुकर कासार यांनी प्रास्ताविक केले. परीक्षक श्रद्धा देशपांडे, आनन शिंपी व मुकेश पवार यांनी मनोगतातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. स्पर्धेच्या प्रायोजक सुजाता अवचट (छत्रपती संभाजीनगर) यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विजयकुमार ठाकूरवाड यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. डॉ. मुकुंद करंबेळकर यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. स्पर्धेचा निकाल ग्रंथपाल ग्रंथमित्र अण्णा धुमाळ यांनी जाहीर केला. स्पर्धेचा निकाल महाविद्यालयीन गट ः प्रथम- ऐश्वर्या पाटील (एम. जे. कॉलेज, जळगाव), द्वितीय- दीपश्री साळुंखे (जुलालसिंग राठोड विद्यालय, चाळीसगाव), तृतीय- चेतना हिरे (पाचोरा), उत्तेजनार्थ- ईश्‍वरी दीक्षित (एम. जे. कॉलेज), तेजस लोहार (मणियार महाविद्यालय) व विश्‍वास सूर्यवंशी (राष्ट्रीय महाविद्यालय). शालेय गट ः प्रथम- अनुषा अहिरे (डॉ. काकासाहेब पूर्णपात्रे माध्यमिक विद्यालय), द्वितीय- हर्षदा पाटील (डॉ. काकासाहेब पूर्णपात्रे माध्यमिक विद्यालय), तृतीय- हर्षदा उदावंत (आ. बं. मुलींचे हायस्कूल), उत्तेजनार्थ- अनन्या पाटील, अक्षदा भोईटे, श्रावणी दाभाडे व अर्णव उपासनी यांना देण्यात आले. सर्व विजेत्यांचा रोख रकमेची बक्षिसे व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. ज्येष्ठ साहित्यिक विश्वास देशपांडे यांनी सूत्रसंचालन तर वाचनालयाचे कार्यवाह राजेश ठोंबरे यांनी आभार मानले. वाचनालयाचे उपाध्यक्ष भूषण पाठक, सहकार्यवाह मिलिंद देव, संचालक प्रितमदास रावलानी, प्रकाश कुलकर्णी, प्रा. दीपक शुक्ल, सुबोध मुंदडा, रजनी बुंदेलखंडी आदी उपस्थित होते. --------------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ambaghat Tunnel Project : 2,500 कोटी रुपये खर्च अन् 7 किमी लांबी...; आंबाघाटातील प्रस्तावित सहापदरी बोगदा कसा असेल? केंद्राकडे 'त्या' तीन पर्यायी अलाइनमेंट सादर

Wedding Muhurat 2027 : तुळशी विवाहानंतर सनई-चौघडे वाजणार; नव्या वर्षात सर्वाधिक मुहूर्त, पाहा जानेवारी ते जून 2027 चे संपूर्ण वेळापत्रक

Ganpatipule Tourism : सलग सुट्ट्यांमुळे कोकण 'हाऊसफुल्ल'! गणपतीपुळ्यात अवघ्या 3 दिवसांत तब्बल 60 हजार पर्यटकांची हजेरी, वॉटर स्पोर्ट्ससह आरे-वारेतील 'या' थरारक खेळाला सर्वाधिक पसंती

जेन्सेन हुआंग यांच्या कमबॅकमुळे अमेरिकी शेअर बाजारात जल्लोश; Nvidiaच्या शेअर्सची मोठी उसळी

Valhe Accident : चिमुकल्यांसमोरच वडिलांवर काळाचा घाला! वाल्हे येथे दुचाकी व चारचाकीचा अपघात; महिला गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT