नाशिक

चौधरी स्मृती पुरस्कार वितरण सोहळा आज जळगावात

CD
चौधरी स्मृती पुरस्कार वितरण सोहळा आज जळगावात उपशीर्षक साहित्यिकांचा होणार गौरव सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. १९ : श्री गजानन हार्ट अँड आय हॉस्पिटलतर्फे साहित्य पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन शुक्रवारी (ता.२०) करण्यात आले आहे. या सोहळ्यात स्व. गणेश चौधरी सर्वोत्कृष्ट कविता संग्रह पुरस्कार २०२५ आणि स्व. दिवाकर चौधरी सर्वोत्कृष्ट कादंबरी पुरस्कार २०२५ प्रदान करण्यात येणार आहेत. स्व. गणेश चौधरी सर्वोत्कृष्ट कविता संग्रह पुरस्कारासाठी हस्ताक्षर प्रकाशन, नांदेड प्रकाशित कवितासंग्रहाची निवड करण्यात आली असून, या पुरस्काराचे मानकरी कवी श्रीकांत ढेरंगे (पुणे) आहेत. तसेच स्व. दिवाकर चौधरी सर्वोत्कृष्ट कादंबरी पुरस्कारासाठी ''गुरू एका योगियाचे तुरियातीत स्वप्न'' या कादंबरीची निवड करण्यात आली असून, या पुरस्काराचे मानकरी कादंबरीकार नितीन कोत्तापल्ले (सायन पब्लिकेशन, पुणे यांनी प्रकाशित केलेली कादंबरी) आहेत. दोन्ही पुरस्कारांचे स्वरूप प्रत्येकी २५ हजार रुपये रोख, सन्मानचिन्ह व मानपत्र असे आहे. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून प्रा. डॉ. आशुतोष पाटील (धुळे) व डॉ. अतुल सरोदे उपस्थित राहणार आहेत. अध्यक्षस्थानी प्रा. अरुण पाटील असतील. कार्यक्रमाचे संयोजन डॉ. विवेक दिवाकर चौधरी करीत आहेत. शुक्रवारी (ता.२०) सायंकाळी पाचला आयएमए हॉल, व. वा. वाचनालयाजवळ येथे हा सोहळा होणार आहे. -----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

गोकुळच्या दूध खरेदी-विक्री दरात वाढ, संचालक मंडळाच्या बैठकीत मोठा निर्णय

SA vs BAN 1st Test : १२ धावांचे लक्ष्य अन् दक्षिण आफ्रिकेचा ९ चेंडूंत विजय! WTC Final च्या शर्यतीत मोठी उलथापालथ, भारताच्या स्वप्नांना धक्का; समजून घ्या गणित

पुण्यात झाडं न लावताच वाळली, साडेबारा कोटी खर्च; वृक्षारोपणात घोटाळ्याचा आरोप, वनमंत्री म्हणाले, 'कुणी केलं माहिती घेणार'

SIP Investment: SIP मध्ये पैसा कमवायचा असेल तर किती वर्षे गुंतवणूक करावी? 7 वर्षांचा नियम काय? रीपोर्टमधून मोठा खुलासा!

शर्ट काढून विवाहित अभिनेत्रीला मारली मिठी; सोडायला सांगूनही सोडेना, वर म्हणतो- किस करू का? भर कार्यक्रमात अभिनेत्याने ओलांडल्या मर्यादा

SCROLL FOR NEXT