नाशिक

सारंगखेडा येथील ‘चेतक महोत्सव’चा राष्ट्रीय सन्मान

CD
फोटो : NSK26H31358 दिल्ली : येथील माधवगढ पॅलेस येथे आयोजित सोहळ्यात ‘दिशा फाउंडेशन’तर्फे जयपालसिंह रावल यांचा गौरव करताना अतुलकुमार सिंग. ----------------------- सारंगखेडा येथील ‘चेतक महोत्सव’चा राष्ट्रीय सन्मान चेतक महोत्सवाचे अध्यक्ष जयपालसिंह रावल यांना ‘इक्वाईन एक्सलन्स’ पुरस्कार सकाळ वृत्तसेवा वडाळी, ता. ४ : जागतिक दर्जाचा महोत्सव म्हणून लौकिक मिळवणाऱ्या सारंगखेडा येथील चेतक महोत्सवाचा राष्ट्रीय पातळीवर सन्मान करण्यात आला आहे. अश्व संवर्धन आणि घोड्यांच्या उत्सवाला नवा आयाम देणाऱ्या या महोत्सवाच्या उल्लेखनीय कार्याची दिल्ली येथील दिशा फाउंडेशनने दखल घेतली असून, चेतक महोत्सवाचे अध्यक्ष जयपालसिंह रावल यांना प्रतिष्ठेचा मानला जाणारा ‘इक्वाईन एक्सलन्स पुरस्कार २०२६’ नुकताच प्रदान करण्यात आला. दिल्लीजवळील गुरुग्राम येथील प्रसिद्ध माधवगढ पॅलेस येथे दिशा फाउंडेशनद्वारे देशातील पहिला ‘अश्व उत्कृष्टता पुरस्कार’ सोहळा पार पडला. भारताच्या स्वदेशी अश्व वारशाचे जतन, संवर्धन आणि विकास करण्यासाठी योगदान देणाऱ्या शेतकरी, व्यावसायिक आणि संरक्षकांना प्रोत्साहन देणारा महोत्सव म्हणून सारंगखेडा येथील चेतक महोत्सवाची निवड करण्यात आली आहे. या सोहळ्यात अश्व क्षेत्राशी संबंधित रायडर्स, ब्रीडर्स, पशुवैद्यक, संशोधक आणि समाजसेवकांच्या दीर्घकालीन योगदानाचा गौरव करण्यात आला. देशभरातून अश्वप्रेमी, डिजिटल कंटेंट क्रिएटर्स आणि या क्षेत्रातील मान्यवर यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्री- प्रॉडक्शनपासून ते संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन व आयोजनापर्यंत भारतातील अश्‍वप्रेमींसाठी चेतक महोत्सव एक मोठी पर्वणी मानली जाते. दिशा फाउंडेशनचे अध्यक्ष अतुलकुमार सिंग यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. व्यासपीठावर केंद्रीय मंत्री कृष्णा तिरज, रवींद्र सायनी, दिपेश सिंग यांची प्रमुख उपस्थिती होती. या राष्ट्रीय सन्मानामुळे सारंगखेडा चेतक महोत्सवाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.

Irani Cup 2026: रिषभ पंतच्या नेतृत्वातील संघ ठरला चॅम्पियन! फायनलमध्ये रणजी ट्रॉफी विजेत्यांना केलं पराभूत

भाकरीसोबत तोंडाला पाणी आणणारी गोळ्याची आमटी; पाहा खानदेशी पद्धतीची रेसिपी; GOLYACHI AAMTI RECIPE

Latest Marathi News Live Update : मालेगाव मध्ये तापमान 38.2 अंशावर पोहचले

France Student Protests : फ्रान्समधील विद्यार्थी आंदोलनाला हिंसक वळण; ४ हजार जणांना अटक, २०० जण जखमी

वय वाढण्याआधीच मानेवर रेषा दिसू लागल्यात? या टेक लाइन्स घालवण्यासाठी जाणून घ्या डॉक्टरांनी सांगितले ४ सोपे व्यायाम

SCROLL FOR NEXT