Former Deputy Chief Minister Chhagan Bhujbal inspected the large number of potholes on the Nashik-Mumbai to Agra National Highway.
Former Deputy Chief Minister Chhagan Bhujbal inspected the large number of potholes on the Nashik-Mumbai to Agra National Highway. esakal
नाशिक

Chhagan Bhujbal : नाशिक- मुंबई महामार्गाच्या दुरावस्थेवरून छगन भुजबळ आक्रमक

विजय पगारे

इगतपुरी (जि. नाशिक) : सर्वाधिक वर्दळीचा महामार्ग म्हणुन ओळख असणाऱ्या मुंबई-आग्रा महामार्गावरील नाशिक-इगतपुरी ते कसारा घाट दरम्यानच्या रस्त्याला गेल्या दोन महीन्यापासुन होत असलेल्या मुसळधार पावसामुळे खड्डयांचे साम्राज्य पसरले असुन महामार्गाची अक्षरशः चाळण झाली आहे. याच मार्गावर असंख्य खड्डे झाले असुन या खड्यांमुळे रोज अपघात होऊन अनेकजण जायबंदी होत आहे.

या मार्गावरील घोटी येथील टोलनाका प्रशासन फक्त टोल वसुलीवर लक्ष केंद्रित करत असुन रस्ता दुरुस्तीकडे साफ दुर्लक्ष करीत आहे. याबाबत मागील महीन्यात सुचना देऊनही प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने आज माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी चांगलीच कान उघडणी केली असुन लवकरात लवकर दुरुस्ती सुधारणा करण्याचे निर्देश दिले आहेत. (Chhagan Bhujbal aggressive on condition of Nashik Mumbai highway Nashik Latest Marathi News)

तसेच येत्या ३१ ऑक्टोबरपर्यंत नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गाची सुधारणा झाली नाही तर १ नोव्हेंबरपासून टोल बंद करण्याचा इशारा राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी नॅशनल हायवे अथोरिटी ऑफ इंडियाच्या अधिकाऱ्यांना देत लोकांच्या संयमाचा अंत पाहू नका असा सज्जड इशारा दिला आहे. छगन भुजबळ यांनी आज नॅशनल हायवेच्या अधिकाऱ्यांसमवेत नाशिक ते वडपे दरम्यान मुंबई महामार्गावरील रस्त्याची पाहणी करत अधिकाऱ्यांची कानउघडनी करत फैलावर घेतले. यावेळी नॅशनल हायवेचे प्रकल्प अधिकारी साळुंखे,गोंदे ते पडघा टोलवेज पीक इंफ्रा कंपनीचे संचालक आनंद सिंग, माजी आमदार शिवराम झोले, माजी जिल्हा परिषद सदस्य गोरख बोडके यांच्यासह अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.

मुंबई आग्रा रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे असल्याने अनेकांना अपघातात आपला प्राण गमवावा लागला.याबाबत छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच नॅशनल हायवे यांना याबाबत पत्र व्यवहार केला आहे.मात्र अद्यापही रस्त्यावर प्रचंड प्रमाणात खड्डे असल्याने आज छगन भुजबळ यांनी आक्रमक भूमिका घेत त्यांनी नॅशनल हायवेच्या अधिकाऱ्यांसमवेत नाशिक ते इगतपुरी दरम्यान रस्त्याची पाहणी केली. यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांना ३१ ऑक्टोबर पर्यंत रस्त्यांवरील खड्डे न बुजविल्यास १ नोव्हेंबर पासून टोल बंद करण्याचा दिला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Telangana CM Revanth Reddy : तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना दिल्ली पोलिसांचं समन्स; अमित शाहांच्या व्हिडीओचं प्रकरण

Sairat Complete 8 Years : मराठी सिनेमाला १०० कोटींचं स्वप्न दाखवणाऱ्या 'सैराट'ला ८ वर्षं पूर्ण; रिंकूची पोस्ट चर्चेत

Share Market Closing: शेअर बाजारात तुफान तेजी; सेन्सेक्स 900 अंकांच्या उसळीसह बंद, गुंतवणूकदार मालामाल

Latest Marathi News Live Update: उदयनराजेंच्या प्रचारासाठी पंतप्रधान मोदी कराडमध्ये दाखल

Nashik News : मालेगावी भाजीपाल्याची आवक स्थिर! मे, जून महिन्यात उत्पादन घटण्याचा अंदाज

SCROLL FOR NEXT