chhagan bhujbal esakal
नाशिक

Chhagan Bhujbal : आरोग्य विद्यापीठाच्या वैद्यकीय महाविद्यालय प्रत्यक्ष काम लवकर सुरवात होण्याची गरज : भुजबळ

सकाळ वृत्तसेवा

Chhagan Bhujbal : सततच्या पाठपुराव्यानंतर नाशिकमधील महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या वैद्यकीय महाविद्यालयाची जागा हस्तांतरण प्रक्रिया अखेर पूर्ण झाली.

अगोदरच महाविद्यालय इमारत बांधकामाला प्रशासकीय मान्यता मिळाली असल्याने लवकर वैद्यकीय महाविद्यालयाच्या कामास सुरवात करण्यात येऊन किमान पुढच्या वर्षापासून वैद्यकीय महाविद्यालयातील प्रवेश प्रक्रिया सुरु करण्यात यावी, अशी मागणी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केली. (Chhagan Bhujbal Medical College of Health University Need to start actual work soon nashk news)

विधीमंडळाच्या अधिवेशनात श्री. भुजबळ यांनी जागेच्या हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण करून लवकर बांधकामाला सुरवात करण्याची मागणी केली होती.

त्यावेळी महाविद्यालय इमारत कामाची निविदा प्रक्रिया आठ दिवसात सुरू करून कामाला सुरवात झाल्यावर दीड ते दोन वर्षात काम पूर्ण होईल, अशी माहिती वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी सभागृहात दिली होती.

श्री. भुजबळ म्हणाले, की महाविकास आघाडी सरकारच्या काळात मंत्रिमंडळ बैठकीत महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे शंभर विद्यार्थी क्षमतेचे नवीन वैद्यकीय महाविद्यालय व संलग्न ४३० खाटांचे रुग्णालय आणि महाराष्ट्र पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण संशोधन संस्थेस मान्यता दिली होती.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

त्यानंतर जिल्हा रुग्णालय आवारात मागील वर्षापासून पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण सुरु झाले. मात्र या कॅम्पससाठी अधिकच्या जागेची आवश्यकता असल्याने महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने मौजे म्हसरूळ शिवारातील सर्वे क्रमांक २५७ मधील १४ हेक्टर ३१ आर जागेची मागणी केली होती.

ही जागा विद्यापीठास देण्यासाठी महापालिकेचा ठराव झाला होता. २५ नोव्हेंबर २०२१ ला ही जागा देण्यास नगरविकास विभागाने मान्यता दिली. मात्र जागेचे मूल्यांकन २० कोटी ३ लाख असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी विभागीय आयुक्तांमार्फत १२ मे २०२२ ला महसूल विभागाला प्रस्ताव सादर केला होता. दहा महिन्यांपासून जागा हस्तांतरणाचा प्रस्ताव सरकारकडे प्रलंबित होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Heavy Rain Alert: विदर्भासाठी अलर्ट! जोरदार पावसाचा इशारा; राज्यातल्या 'या' भागात मुसळधार बरसणार

Manish Kashyap : भाजपला सोडचिठ्ठी दिलेल्या प्रसिद्ध युट्यूबर मनीष कश्यपने सुरू केली नवी राजकीय इनिंग!

Latest Maharashtra News Updates : शित्तूर -आरळा व चरण -सोंडोली पुलावर सुरक्षिततेसाठी कोकरूड पोलिसांनी लावले बॅरिकेट

Trapit Bansal: भारतीय तरुणाचा जगभरात डंका! IITian त्रपित बंसलला Meta कडून अब्जावधींची ऑफर; सॅलरी ऐकून व्हाल थक्क

Pune News : पुणे बाजार समितीच्या दिलीप काळभोर यांचा सभापतीपदाचा राजीनामा

SCROLL FOR NEXT