Chhagan Bhujbal esakal
नाशिक

Chhagan Bhujbal : ...तर तुमचे आरक्षण राहील का? भुजबळ यांचा जरांगेंना सवाल

मनोज जरांगे-पाटील यांनी गुरुवारी (ता. ८) नाशिक दौऱ्यावर भुजबळ यांच्यावर टीका करताना मंडल आयोगालाच आव्हान दिले.

सकाळ वृत्तसेवा

Chhagan Bhujbal : मनोज जरांगे-पाटील यांनी गुरुवारी (ता. ८) नाशिक दौऱ्यावर भुजबळ यांच्यावर टीका करताना मंडल आयोगालाच आव्हान दिले.

यावर बोलताना राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्याच्या मागणीला आमचा पाठिंबा आहे. (chhagan Bhujbal question to Jarange patil about maratha reservation nashik news)

मात्र, झुंडशाही व मागच्या दाराने प्रवेशाला त्यांना विरोध असून, ओबीसी आरक्षण मंडल आयोगाचा भाग आहे. मंडल आयोग गेला तर त्यांचे आरक्षण राहील का? असा सवाल भुजबळांनी उपस्थित केला आहे. दक्षिण मुंबईतील दहिसर भागात शिवसेनेच्या ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची फेसबुक लाइव्ह सुरू असताना गोळ्या घालून हत्या झाली.

गोळ्या झाडणाऱ्या मॉरिस नरोना याने स्वतःवरही गोळी झाडून आत्महत्या केली. यावरून राज्यात राजकारण तापले आहे. या प्रकरणात राज्य सरकार टीकेचे धनी होत असून, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांकडून होत आहे. त्यावर माध्यमांशी शुक्रवारी (ता. ९) संवाद साधताना भुजबळ यांनी फडणवीस यांची पाठराखण केली. पोलिसांनी गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना बंदूक परवाना देऊ नये.

मॉरिस जेलमध्ये होता. त्याच्याकडे बंदूक कशी आली? असा सवाल उपस्थित करताना गृहमंत्री यात काय करू शकतात? त्यामुळे राजीनाम्याची मागणी चुकीची असल्याचे ते म्हणाले. पोलिस चोऱ्या व दंगली अशा घटनांमध्ये संरक्षण देतात. मात्र, फेसबुक लाइव्हसारख्या घटना घरातून होतात. त्यामुळे पोलिस येथे येऊ शकत नसल्याचेही भुजबळ यांनी स्पष्ट केले.

मी इच्छुक अन मलाच माहिती नाही

बाबा सिद्दिकी यांच्या पक्ष प्रवेशाबाबात बोलताना भुजबळ म्हणाले, की सिद्दिकी राज्यमंत्री राहिले आहेत. त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षास फायदा होईल. त्यांना राज्यसभेची उमेदवारी दिली जाणार की नाही, याची कल्पना नाही. मीही राज्यसभेसाठी इच्छुक आहे, याची मलाच कल्पना नाही, अशी उपहासात्मक प्रतिक्रिया भुजबळ यांनी या वेळी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

५ मिनिटाच्या रस्त्यासाठी अर्धा तास! राज ठाकरेंना अनुभवावं लागलं पुण्याचं ट्रॅफिक... रोज कोंडीत अडकणाऱ्या पुणेकरांच्या मनस्तापात भर

Car Prices: फक्त काही दिवस थांबा! गाड्या 1.5 लाखांनी स्वस्त होणार? काय आहे कारण?

Pasha Patel statement : ‘’... त्याचे भोग आपल्याला भोगावे लागणार’’; अतिवृष्टीने शेतकरी हवालदिल अन् पाशा पटेलांचं वादग्रस्त विधान!

Ganesh Chaturthi 2025 : भाद्रपद महिना 'या' राशींसाठी घेऊन येणार मोठा ट्विस्ट, बाप्पाच्या येण्याने होणार संकटांचा विनाश

Solapur News: रहाटेवाडी-तामदर्डी पूल बांधकामासाठी कोटी ६ कोटी ५० लाख निधी मंजूर, जनतेच्या मागणीला यश

SCROLL FOR NEXT