Chhagan Bhujbal esakal
नाशिक

इंपिरिकल डेटासंदर्भात केंद्राला बाजू मांडण्याचे आदेश : भुजबळ

महेंद्र महाजन

नाशिक : इतर मागास प्रवर्गाचे (ओबीसी) राजकीय आरक्षण (OBC Reservation) पूर्ववत करण्यासाठी इंपिरिकल डेटा आवश्यक आहे. त्यासाठी केंद्र शासनाकडील ओबीसींची सामाजिक व आर्थिक जनगणनेची माहिती उपलब्ध करून देण्यासंदर्भात राज्य शासनातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर सोमवारी (ता. ९) सुनावणी झाली. यात केंद्र सरकारला आपली बाजू मांडण्याचे आदेश सर्वोच्च न्‍यायालयाने दिले असल्याची माहिती राज्याचे अन्न- नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली.

राज्य सरकारतर्फे ज्‍येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल बाजू मांडत असल्याचेही त्यांनी सांगितले. कायदेशीर बाबींच्या पुर्ततेअभावी स्थगित झालेल्या ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणाला पूर्ववत करण्यासाठी राज्य सरकाराकडून प्रयत्न सुरु आहेत. आरक्षण पूर्ववत करण्यासाठी महत्त्वाचा असलेला इंपिरिकल डेटा केंद्राने द्यावा, यासाठी राज्य सरकारने याचिका दाखल केली आहे. दरम्यान, याचिकेवरील पुढील सुनावणी २४ ऑगस्टला होणार आहे. या वेळी केंद्र शासनाला इंपिरिकल डेटासंदर्भात भुमिका मांडावी लागणार आहे. सोमवारी झालेल्‍या सुनावणीविषयीची माहिती मंत्री भुजबळ यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मूड खराब आहे? कामाचा ताण आलाय? तर ऑफिसला दांडी मारा! 'या' कंपनीने सुरू केली ‘Unhappy Leave’ पॉलिसी

कोब्राने फणा काढला, मुंगूस भिडला; कुणीही माघार घेईना, थरारक लढतीचा VIDEO व्हायरल

WEEKLY HOROSCOPE: नशिबाची दारं उघडणार! ‘या’ राशींना पुढील ७ दिवसांत पैसा, प्रमोशन अन् मोठी संधी

Fast food restaurant: चिकनमध्ये आढळलं कंडोम! दाम्पत्य हादरलं, हॉटेलविरोधात कोर्टात धाव

Beed News : बोगस शालार्थ आयडी घोटाळा; बीडच्या शिक्षणाधिकारी किरण कुवर यांचा जामीन अर्ज फेटाळला

SCROLL FOR NEXT