Minister Chhagan Bhujbal and citizens during Bhoomi Puja for various road works esakal
नाशिक

Chhagan Bhujbal : धमक्यांना मी घाबरत नाही! भुजबळ

येवल्यात रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाचे भूमिपूजन

सकाळ वृत्तसेवा

Chhagan Bhujbal : मी कोणत्याही देवदेवतांचा अपमान केला नसून मविप्रच्या कार्यक्रमात संस्था स्थापनेचा इतिहास आणि महापुरुषांचे योगदान सांगितले. किंबहुना महापुरुष हेच माझे देव असून, कोणी गोळी घालू म्हणाले, तरी मी असेच म्हणत राहणार आहे.

आमचे देव आम्ही ठरवू, आम्हाला कोणी सांगण्याची गरज नाही. ५५ वर्षांपासून समाज व राजकारणात आहे. अशा फालतू गोष्टी आणि धमक्यांना मी घाबरत नाही, अशी भूमिका अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी मांडली. (Chhagan Bhujbal statement I am not afraid of threats nashik)

‘भुजबळांच्या कानाखाली मारेल, त्याला एक लाख रुपयांचे बक्षीस देऊ’, असे वक्तव्य परशुराम सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष विश्वजित देशपांडे यांनी केले असून, याबाबत येथे भुजबळांनी आपली भूमिका मांडली.

दिवसभराच्या दौऱ्यात त्यांच्या हस्ते शहरातील विविध कामांचे उद्‌घाटनही झाली. शहरात जिल्हास्तर नगरोत्थान योजनेंतर्गत वल्लभनगर भागात ६० लक्ष निधीतून उभारलेल्या व्यायामशाळेचे लोकार्पण मंत्री भुजबळ यांच्या हस्ते झाले.

उत्तम आरोग्य हिच आपली धनसपंदा असून, शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी व्यायाम अत्यावश्यक आहे. व्यायमाशाळेत स्त्रिया व पुरुषांसाठी स्वतंत्र व्यवस्था आहे.

आवश्यक व्यायामाचे साहित्य लवकरच उपलब्ध होणार असल्याचे श्री. भुजबळ यांनी सांगितले. आहार पद्धतीतील बदलामुळे आज आपणास नानाविध आरोग्याच्या समस्या व नानाविध रोगांना सामोरे जावे लागत आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

आपले शरीर निरोगी राहण्याच्या दृष्टीने प्रत्येकाने आपल्या दिनचर्येतून व्यायमासाठी वेळ देणे काळाची गरज आहे. सर्व स्त्री व पुरुषांनी व्यायमाशाळेचा लाभ घ्यावा, असे आवाहन भुजबळ यांनी केले.

प्रांताधिकारी बाबासाहेब गाढवे, मुख्याधिकारी किरण देशमुख, बाळासाहेब लोखंडे, वसंत पवार, बंडू क्षीरसागर, शहराध्यक्ष दीपक लोणारी यांच्यासह नागरिक उपस्थित होते.

दरम्यान, भुजबळांच्या हस्ते न्हावी गल्लील रस्ता काँक्रिटीकरण, काळा मारुती ते सुरेश मेडिकलपर्यंत रस्ता गटारीसह काँक्रिटीकरण, सटवाई गल्लीत रस्ता कॉंक्रिटीकरण, मधली गल्लीतील रस्ता काँक्रिटीकरण, निवारा कॉलनी रस्ता काँक्रिटीकरण, स्वातंत्रसैनिक कॉलनीत रस्ता गटारीसह कॉंक्रिटीकरणाचे भूमीपूजन झाले. या कार्यक्रमांना त्या-त्या परिसरातील नागरिक व पदाधिकारी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News : पुणे बाजार समितीच्या दिलीप काळभोर यांचा सभापतीपदाचा राजीनामा

Pune court verdict : पत्नीशी दोनदा घटस्फोट, तिसऱ्यांदा लग्नाचं वचन देत केला बलात्कार? ; पुणे कोर्टाने पतीला सोडलं निर्दोष, कारण...

Latest Maharashtra News Updates : दिलीप काळभोर यांचा सभापतीपदाचा राजीनामा

Viral Video: महिला पोलिसाचं धाडस! महाकाय १६ फूट लांब किंग कोब्रा पकडला, पाहा थरारक व्हायरल व्हिडिओ

Navi Mumbai: रिल्स बनवण्यासाठी रेल्वेवर चढला, इतक्यात ओव्हरहेड वायरला चिटकला अन्...; क्षणात आयुष्य उद्ध्वस्त

SCROLL FOR NEXT