Chhagan Bhujbal esakal
नाशिक

Chhagan Bhujbal News: ओबीसींच्या हक्कांसाठी सर्वांनी.... छगन भुजबळ यांचे वक्तव्य

सकाळ वृत्तसेवा

Chhagan Bhujbal : ओबीसी घटकांमध्ये कुंभार समाज लोकसंख्येने मोठा समाज असून ओबीसींच्या प्रश्नावर लढा देण्यासाठी पुढे आले पाहिजे.

ओबीसींना आपले हक्क अबाधित ठेवायचे असल्यास सर्व ओबीसी घटकांनी एकत्र येण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन राज्याचे अन्न-नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केले.

जिल्हा कुंभार विकास समितीतर्फे झालेल्या विद्यार्थी गुणगौरव आणि समाजभूषण व जीवनगौरव पुरस्कार वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. (chhagan bhujbal statement on obc rights nashik news)

आमदार प्रा. देवयानी फरांदे, काँग्रेसचे शरद आहेर, कुंभार विकास समितीचे रमाकांत क्षीरसागर आदी उपस्थित होते. श्री. भुजबळ म्हणाले, की कुंभार समाजाला नवीन तंत्रज्ञान देण्यासाठी प्रशिक्षण केंद्राची गरज आहे. त्यासाठी सरकारकडे पाठपुरावा करण्यात येईल.

ओबीसी घटकांना न्याय देण्यासाठी सरकारने मोदी आवास घरकुल योजना सुरू केली. त्यासाठी १२ हजार कोटी रुपये खर्च होतील.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

ओबीसी समाजातील सर्व घटकांनी या योजनेचा लाभ घेण्याची आवश्यकता आहे. जे पात्र लाभार्थी आहे त्यांच्यापर्यंत ही माहिती पोचवण्याची आवश्यकता आहे.

यांचा झाला सन्मान

जीवनगौरव : लिज्जत पापड उद्योग समूहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश कोते, ओझरचे विश्‍वनाथ आहेर, सिन्नरचे किसनराव जाधव.

समाजभूषण : निवृत्त अधिकारी नारायण करंगळे, पत्रकार गोकुळ सोनवणे, शिरपूरचे सुभाष कुंभार, रतिलाल कुंभार, निवृत्त पोलिस अधिकारी भगवान सूर्यवंशी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Strait of Hormuz: 'होर्मुझ सामुद्रधुनी'वरून इराणमध्येच पडले दोन गट; लष्कर आणि सरकारमध्ये बिनसलं, जगावर पुन्हा इंधन संकटाचं सावट

Shirampur Murder: जेवण उशिरा मिळाल्याचा वाद जीवावर बेतला; हॉटेल मालकाची निर्घृण हत्या, श्रीरामपूर हादरले!

Latest Marathi News Update: आदिती तटकरे पालखी सोहळ्यामध्ये डोक्यावर तुळशी वृदांवन घेऊन सहभागी

Social Service Initiative: भिवधानोरा-पंढरपूर दिंडीतील वारकऱ्यांना तुकाराम सटाले यांच्याकडून रेनकोट वाटप; सेवाभावी उपक्रमाचे कौतुक

Davdi Free Eye Camp: दावडीत दर महिन्याच्या पहिल्या गुरुवारी मोफत नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया; २ हजारांहून अधिक रुग्णांना नवदृष्टी

SCROLL FOR NEXT