chhagan bhujbal and kapil sibal esakal
नाशिक

OBC Reservation : छगन भुजबळ घेणार कपिल सिब्बल यांची भेट

सकाळ डिजिटल टीम

नाशिक : ओबीसी आरक्षणासंदर्भात (obc reservation) राज्य सरकारनं दाखल केलेल्या याचिकेवर उद्या (ता.२४) सुनावणी होणार आहे. मंत्री छगन भुजबळ दिल्ली दौऱ्यावर असून यासंदर्भात ते ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांची भेट घेणार आहेत. दरम्यान राज्य सरकारतर्फे ज्‍येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल बाजू (kapil sibbal) मांडत असल्याचेही भुजबळांनी सांगितले. कायदेशीर बाबींच्या पुर्ततेअभावी स्थगित झालेल्या ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणाला पूर्ववत करण्यासाठी राज्य सरकाराकडून प्रयत्न सुरु आहेत.

इतर मागास प्रवर्गाचे (ओबीसी) राजकीय आरक्षण (OBC Reservation) पूर्ववत करण्यासाठी इंपिरिकल डेटा आवश्यक आहे. त्यासाठी केंद्र शासनाकडील ओबीसींची सामाजिक व आर्थिक जनगणनेची माहिती उपलब्ध करून देण्यासंदर्भात राज्य शासनातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर सोमवारी (ता. ९) सुनावणी झाली होती. यात केंद्र सरकारला आपली बाजू मांडण्याचे आदेश सर्वोच्च न्‍यायालयाने दिले असल्याची माहिती राज्याचे अन्न- नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली होती.

राज्य सरकारतर्फे ज्‍येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल बाजू मांडत असल्याचेही त्यांनी सांगितले. कायदेशीर बाबींच्या पुर्ततेअभावी स्थगित झालेल्या ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणाला पूर्ववत करण्यासाठी राज्य सरकाराकडून प्रयत्न सुरु आहेत. आरक्षण पूर्ववत करण्यासाठी महत्त्वाचा असलेला इंपिरिकल डेटा केंद्राने द्यावा, यासाठी राज्य सरकारने याचिका दाखल केली आहे. दरम्यान, याचिकेवरील पुढील सुनावणी २४ ऑगस्टला होणार आहे. या वेळी केंद्र शासनाला इंपिरिकल डेटासंदर्भात भुमिका मांडावी लागणार आहे. सोमवारी झालेल्‍या सुनावणीविषयीची माहिती मंत्री भुजबळ यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Crackdown: पुण्यात ‘चार बेस, चार टॉप’ तरीही ध्वनिप्रदूषणाचा दणदणाट; ११०० मंडळांच्या ध्वनीची नोंद, नियमभंगावर कारवाई

Nashik Dindori crime news: लखमापूरमध्ये ७० वर्षीय मंदाकिनी सोनवणे यांची हातपाय बांधून शेततळ्यात निर्घृण हत्या; गावकऱ्यांकडून सखोल चौकशी व न्यायाची मागणी

दिल्ली इमारत दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, पाच जणांची प्रकृती गंभीर; नेमकी कशी घडली घटना? कारण आलं समोर

Weekly Horoscope 7 to 13 september : या आठवड्यात पाच राशींचं नशीब पालटणार; कुणाला घ्यावी लागेल काळजी? वाचा...

Pune Highway Robbery: शिरूरमध्ये एसटी बस अडवून चालक-वाहकाला मारहाण; ₹८,९६० लुटले, चौघे जेरबंद, स्कॉर्पिओ जप्त

SCROLL FOR NEXT