मेहरुण तलावावर
आज छटपूजेचा सोहळा
उत्तर भारतीय बांधवांचा दोन दिवसीय कार्यक्रम
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. १४ : उत्तर भारतीय संघ छटपूजा समितीतर्फे मेहरुण तलाव येथील गणेश घाटावर दोन दिवसीय छटपूजा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. रविवारी (ता. १५) सायंकाळी पाचपासून सुरू होणाऱ्या या धार्मिक सोहळ्याची सांगता सोमवारी (ता. १६) सकाळी उगवत्या सूर्यनारायणाला अर्घ्य अर्पण करून होणार आहे.
रविवारी सायंकाळी पाचपासून छटपूजेच्या पहिल्या अर्घ्याला सुरुवात होईल. त्यानंतर रात्री उशिरापर्यंत धार्मिक विधी, पूजा, महाप्रसाद आणि भजन संध्या असे विविध कार्यक्रम होणार आहेत. या धार्मिक विधींसाठी पुरोहित म्हणून पंडित लवकुश दुबे आणि अमरीशकुमार पाठक उपस्थित राहणार आहेत. सोमवारी पहाटे उगवत्या सूर्यनारायणाला जल अर्पण करून छटपूजेचा मुख्य विधी पार पडेल. यावेळी गायत्री मंत्रोच्चारात होम-हवन करण्यात येणार आहे. कुटुंबात सुख-शांती, संततीप्राप्ती आणि उत्तम आरोग्य लाभावे, यासाठी भाविकांकडून प्रार्थना केली जाणार आहे. सोमवारी सकाळी आठपर्यंत धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. परिसरातील उत्तर भारतीय बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन समितीचे अध्यक्ष ललन यादव, उपाध्यक्ष मनोहर सहानी, कार्याध्यक्ष चंदन सहानी, कोषाध्यक्ष राजेश विश्वकर्मा, सचिव यशवंत मिश्रा आणि सहसचिव राजेश सहानी यांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.