धुळे टुडे २ साठी...
---
फोटो-NSK26H33683
धुळे : राष्ट्रीय शस्त्रांग मार्शल आर्ट स्पर्धेसाठी निवड झालेल्या छत्रपती शिवाजी पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांसह शिक्षक.
---
छत्रपती शिवाजी पब्लिक स्कूलच्या
१५ विद्यार्थ्यांची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड
---
पंजाब येथे २७, २८ डिसेंबरला होणाऱ्या स्पर्धेत सहभाग
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. २७ : शिवाजी विद्या प्रसारक संस्थेच्या हरणमाळ येथील छत्रपती शिवाजी पब्लिक स्कूल येथील १५ विद्यार्थ्यांची पंजाब (चंदीगड) येथे २७ व २८ डिसेंबर २०२६ ला होणाऱ्या राष्ट्रीय शस्त्रांग मार्शल आर्ट स्पर्धेसाठी निवड झाली. या उल्लेखनीय यशामुळे शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेसाठी एकाच शाळेतील १५ विद्यार्थ्यांची निवड होणे ही शाळेसाठी अभिमानाची बाब आहे. यात क्रीडा शिक्षक हेमराज भामरे, राजेश मोरे व रेश्मा मराठे यांचे विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थ्यांनी मेहनत, सातत्यपूर्ण सरावा, शिस्त आणि जिद्दीच्या जोरावर हे यश संपादन केले. या सर्व खेळाडूंनी राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत सहभागी होण्याचा मान मिळवून आपल्या क्रीडागुणांची चुणूक दाखवून दिली. आता पंजाब (चंदीगड) येथे होणाऱ्या स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करून पदके मिळविण्याचे आणि आपल्या शाळेसह धुळे जिल्ह्याचा नावलौकिक वाढविण्याचे ध्येय या खेळाडूंसमोर असणार आहे.
निवड झालेले खेळाडू असे
या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झालेल्या विद्यार्थी खेळाडूंमध्ये रूपाली पाडवी, कनिष्का ढोले, अनुष्का भालेराव, सोनाक्षी सोनवणे, अवनी साळुंके, मयुरी तिवारी, श्रद्धा शिवदे, कार्तिका पारखे, गुंजन भामरे, राम पाटील, कार्तिक साबळे, कार्तिक गावित, दिवेश सोनवणे, कार्तिक चौधरी आणि दीपेश खंडीकर यांचा समावेश आहे.
व्यवस्थापनाकडून कौतुक
विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल शाळा व्यवस्थापन, प्राचार्य, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सर्व खेळाडूंचे कौतुक केले. विद्यार्थ्यांनी मिळविलेले हे यश त्यांच्या मेहनतीचे आणि क्रीडाक्षेत्रातील प्रगतीचे प्रतीक असल्याची भावना व्यक्त करण्यात आली.
---
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.