Chhagan Bhujbal and Sena MLA Suhas Kande Team eSakal
नाशिक

भुजबळांविरोधातील तक्रार मागे घ्या, आमदार कांदेना छोटा राजन गॅंगचा फोन

विनोद बेदरकर

नाशिक : नांदगाव डीपीडीसीच्या निधी वाटपावरून सुरु झालेला सुहास कांदे (Suhas Kande) विरुद्ध छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) वाद वेगळे वळण घेताना दिसत आहे. आमदार कांदे यांना त्यानी उच्च न्यायालायात दाखल केलेली याचिका मागे घ्यावी यासाठी मुंबईहून फोन आल्याची तक्रार त्यांनी केली आहे. नाशिकला गंगापूर पोलिस ठाण्यात आमदार कांदे यांनी तक्रार अर्ज केला असून त्यात कोर्टात केलेली याचिका मागे घ्या असा छोटा राजनचा पुतण्याने फोन केल्याची तक्रार त्यांनी दिली आहे. आमदार कांदे यांनी पोलिस आयुक्तांकडेही तक्रार अर्ज केला आहे.

भुजबळांच्या डीपीडीसीतील निधी वाटपावर संशय व्यक्त करीत, जिल्हा नियोजन समितीतील निधी वाटपातील अन्यायविरोधात आमदार कांदे यांनी थेट उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. नांदगाव मतदारसंघाच्या विकासकामाच्या आढावा बैठकीत यापूर्वी जिल्हा नियोजन मंडळाच्या कामांच्या वाटपात नांदगावचा निधी अन्यत्र वळविण्यात आला आहे. याबाबत पालकमंत्री भुजबळ यांनी निधीचा वापर व्यावस्थित केलेला नाही. तसेच १० कोटींच्या कामांचा निधी परस्पर कंत्राटदारांना दिल्याचा आरोप केला होता. दरम्यान त्यानुसार ही उच्च न्यायालयात केलेली याचिका मागे घ्यावी यासाठी छोटा राजन याचा पुतण्या अक्षय निकाळजे यांने ९६६४६६६६७६ या क्रमांकावरून दुरध्वनी केला. हा खटला मागे घ्या, अन्यथा आमच्याशी गाठ आहे, असे धमकावले. असे नाशिक पोलिसांत दाखल तक्रारीत म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tamhini Ghat Accident: ताम्हिणी घाटातल्या गूढ अपघाताचा उलगडा… कोकणातून हॉटेल चालकाचा फोन ठरला टर्निंग पाईंट! नाहीतर...

Kolkata Earthquake : भूकंपाच्या धक्क्याने कोलकाता हादरले; लोक घाबरून घरं सोडून पळाले; बांगलादेशातही बसले हादरे

Television Day 2025: स्क्रीनवरचे डाग होतील गायब! ‘या’ 3 उपायांनी करा टीव्हीची परफेक्ट स्वच्छता

Latest Marathi News Live Update : विद्येचे धडे देणाऱ्या मुख्याध्यापकांचा शाळेत मद्यधुंद अवस्थेत धिंगाणा

Ashes 2025 England vs Australia : खरोखरची राख असलेली 'अ‍ॅशेस ट्रॉफी' आता कुठं आहे? त्यात नेमकी कशाची राख आहे? जाणून घ्या...

SCROLL FOR NEXT