नाशिक

शिरपूर : विकास बातमी

CD
गुणवत्तापूर्ण, दर्जेदार कामावर भर द्या, पटेल शिरपूर, ता. ७ : मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजना शेतकर्‍यांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. तालुक्यात तब्बल २३० पाणंद रस्ते मंजूर असून, त्यांची कामे टप्प्याटप्प्याने पूर्ण करण्यात येतील. ही कामे गुणवत्तापूर्ण आणि दर्जेदार व्हावीत यासाठी सर्व यंत्रणांनी काळजीपूर्वक लक्ष द्यावे, असे आवाहन आमदार अमरीशभाई पटेल यांनी केले. उंटावद (ता. शिरपूर) येथे महसूल विभागाच्या मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजनेअंतर्गत जिल्ह्यातील पहिल्या पाणंद रस्त्याचे भूमिपूजन बुधवारी (ता. ७) त्यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी आमदार पटेल बोलत होते. आमदार काशीराम पावरा, उपविभागीय अधिकारी डॉ. शरद मंडलिक, तहसीलदार महेंद्र माळी, बाजार समिती सभापती के. डी. पाटील, जि. प. चे माजी उपाध्यक्ष देवेंद्र पाटील, सरपंच मनीषा राजकपूर मराठे, बाजार समितीचे उपसभापती लक्ष्मीकांत पाटील, पाणंद रस्ता समिती सदस्य जगतसिंह राजपूत, बाळासाहेब पाटील, इंद्रसिंह पावरा आदी उपस्थित होते. आमदार पावरा म्हणाले की, शेतकऱ्यांना पाणंद रस्त्यांचा मोठा फायदा होणार आहे. डॉ. शरद मंडलिक म्हणाले की, डिसेंबर २०२५ मध्ये मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजना सुरू करण्यात आली असून, तालुक्यात तिची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येणार आहे. पोलिस पाटील राजू सातकर यांनीही मनोगत व्यक्त केले. ग्रामसेवक नगराज देवरे यांनी सूत्रसंचालन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Milk Adulteration : दुध भेसळीचे धागेदोरे मंचरपासून सोलापूर, इंदापूरपर्यंत; ‘एफडीए’ ने काढली भेसळखोरांची कुंडली, 'सोनाई डेअरी'ला भेसळयुक्त दूधाचा पुरवठा

Pune News : आम्ही अधिकारी होण्याचे स्वप्न बघायचे नाही का?; महाज्योतीच्या विद्यार्थ्यांचा सवाल, दोन केंद्रावरील परीक्षा रद्द

Latest Marathi News Live Update : जंतर-मंतरवरील CJP च्या आंदोलनाला राकेश टिकैत यांचा पाठिंबा; ट्रॅक्टरसह दिल्लीला येण्याचे आवाहन

Shendurwada News : रक्तरंजित वाळू, जमिनीच्या व्यवहाराची नशा, अन् विकासकामांतील भ्रष्टाचार मार्गाने पैसा कमावण्याचा नाद सुटेना

MPSC Agitation Suspended : एमपीएससी विद्यार्थ्यांचे टिळक चौकातील आंदोलन स्थगित; उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर निर्णय

SCROLL FOR NEXT