नाशिक

घात - अपघात

CD
चिखलओहोळ शिवारात वाहनाच्या धडकेत एकाचा मृत्यू मालेगाव : मुंबई - आग्रा महामार्गावरील चिखलओहोळ (ता. मालेगाव) शिवारात रिलायन्स बायो गॅस कंपनीजवळ मनोज नानासाहेब दुशिंग (वय ४०, रा. शिर्डी, ता. राहता, जि. अहिल्यानगर) यांना मालेगावहून धुळ्याकडे जाणाऱ्या वाहनाने पाठीमागून जबर धडक दिली. अपघातात मनोज हे गंभीर जखमी होवून त्यांचा मृत्यू झाला. २५ ऑक्टोबरला दुपारी चारला हा अपघात झाला. मृताची पत्नी सविता मनोज दुशिंग (रा. शिर्डी) यांच्या तक्रारीवरुन तालुका पोलिस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल झाला आहे. ----- सौंदाणेत शिवारात एकाचा मृत्यू मालेगाव : सौंदाणे (ता. मालेगाव) येथील बाबुलाल दशरथ पवार (वय ५५) यांची २९ ऑक्टोबरला दुपारी तीनला अचानक तब्येत बिघडली. त्यांना उपचारासाठी सुर्यवंशी हॉस्पीटल येथे नेले. पुढील उपचारासाठी येथील सामान्य रुग्णालयात दाखल केले. डॉ. निलेश शेलार यांनी तपासून त्यांना मयत घोषित केले. तालुका पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्युची नोंद झाली आहे. ----- टिंगरी गावात दुचाकी लंपास मालेगाव : टिंगरी (ता. मालेगाव) येथील दत्तु पितांबर आहिरे (वय ४३) यांची ५० हजाराची दुचाकी (एमएच ४१ बीयु ६८६६) चोरट्यांनी चोरुन नेली. १३ ऑक्टोबरला मध्यरात्री एकच्या ते पहाटे पाचच्या दरम्यान घरासमोर उभी केलेली दुचाकी चोरट्यांनी चोरुन नेली. तालुका पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ----- इस्लामाबाद भागात ऑटोरिक्षाची चोरी मालेगाव : येथील इस्लामाबाद भागातील कासिब शेख (वय ३६) यांची ५० हजाराची ऑटोरिक्षा (एमएच ४१ बी ३०६५) चोरट्यांनी चोरुन नेली. ३० ऑक्टोबरला सायंकाळी सव्वासहाच्या सुमारास घरासमोर उभी केलेली दुचाकी चोरट्यांनी चोरुन नेली. किल्ला पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Metro: पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो मार्गिका ३ च्या तिकीट दरांची घोषणा; ३ नोव्हेंबरला मोदींच्या हस्ते उद्घाटन

'इच्छाधारी नागीण'ची मुख्य अभिनेत्री बदलली! नक्की कारण काय? झी मराठीने दिला प्रेक्षकांना धक्का; नवा प्रोमो Viral

Latest Marathi News Update : पाच हजार रुपयांत शेतकऱ्यांची दिवाळी कशी साजरी होणार? बच्चू कडूंचा सरकारला सवाल

Pargav Water Crisis News : आंबेगावच्या पूर्वभागात घोडनदीकाठी गंभीर जलसंकट; डिंभे धरणातून पाणी सोडण्यासाठी प्रशासनाकडे तीव्र मागणी

Recharge Plan: स्वस्त रिचार्ज प्लान फक्त १७९ रुपयांपासून सुरू! वर्षभर कॉलिंगची सुविधा...पाहा आणखी काय मिळणार?

SCROLL FOR NEXT