Dengue, Chikungunya esakal
नाशिक

पाण्याच्या चणचणीने आदिवासी भागात पोचला चिकुनगुनिया-डेंगी

महेंद्र महाजन

नाशिक : पावसाने दिलेल्या ओढीमुळे पिण्यासाठी साठवून ठेवलेल्या पाण्यात डासांची उत्पत्ती होऊन त्र्यंबकेश्‍वर, पेठ, दिंडोरी या आदिवासी भागात चिकूनगुनिया अन्‌ डेंगी पोचला. आता पावसाला सुरवात झाली असल्याने पाणी वाहू लागले. त्यामुळे डासांची संख्या कमी झाली असून, परिणामी या दोन्ही आजारांची साथ आटोक्यात आली आहे. (Chikungunya-dengue-patients-increase-in-tribal-areas-health-news)

...असे आढळले रूग्ण

गेल्या सात महिन्यांत त्र्यंबकेश्‍वरमध्ये चिकूनगुनियाचे १५, डेंगीचे पाच, पेठमध्ये चिकूनगुनियाचे ३०, डेंगीचे सहा, तर दिंडोरीमध्ये चिकूनगुनियाचे ३३, डेंगीचे सहा रुग्ण आढळले आहेत. सावरगाव (ता. निफाड) येथे चिकूनगुनियाचे चार, तर डेंगीचे पिंपळगाव, नैताळे, ओझर (ता. निफाड) येथे तीन रुग्ण आढळले होते. सायगाव (ता. येवला) येथील मळ्यात एका घरातील तिघांना डेंगी झाल्याचे आढळून आले होते. त्र्यंबकेश्‍वर तालुक्यातील जातेगाव खुर्द, बुद्रुक, तोरंगण, हट्टीपाडा, रोहिले, पिंपरी, नांदगाव कोहाळी, कोटंबी येथील तापाच्या ९९ रुग्णांच्या रक्ताचे नमुने घेण्यात आले होते. त्यातील १५ जणांना चिकूनगुनिया झाल्याचे निष्पन्न झाले होते. याच तालुक्यातील आंबोली आणि नांदगाव कोहाळी येथील ११ पैकी पाच जणांना डेंगी झाल्याचे आढळले होते. दिंडोरी तालुक्यातील निगडोळपाडा आणि गांडोळे येथील ५५ पैकी ३३ जणांना चिकूनगुनिया, आशावाडा, निगडोळ, नळवाडपाडा, गांडोळे येथील ५८ पैकी तिघांना डेंगी, तर पेठ तालुक्यातील म्हसगण, तोरणमाळ, कोहोर, कुळवंडी, आमलोण, कोपुर्ली, असरबारी येथील १३० जणांपैकी ३० जणांना चिकूनगुनिया आणि कुळवंडी, कडवाईपाडा, तोरणमाळ, कोपुर्ली बुद्रुक, असरबारीच्या ७९ पैकी सात जणांना डेंगी झाला होता.

कोरडा दिवस पाळणे महत्त्वाचे

डासांची उत्पत्ती लक्षात घेता, भांडी रिकामी आणि कोरडी ठेवणे महत्त्वाचे आहे. गरजेपेक्षा अधिक पाण्याचा साठा केला जाऊ नये. शिवाय आठवड्यातून एक दिवस कोरडा पाळणे महत्त्वाचे आहे, असा सल्ला आरोग्य विभागातर्फे देण्यात आला.

(Chikungunya-dengue-patients-increase-in-tribal-areas-health-news)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pradeep Purnekar Murder : प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात दोन संशयित ताब्यात, चौघांचा शोध सुरु; कुटुंबीयांचे शिंदे सेनेच्या नेत्यावर गंभीर आरोप

प्रज्ञाविकासाचा राजमार्ग : उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती : इन्स्पायर-एसएचई

IND vs WI, 2nd ODI: नितीश रेड्डीचा प्रयोग फसला, नबीचं होणार पदार्पण? भारताला मालिका खिशात घालण्याची संधी, कुठे पाहाणार सामना?

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर ! 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट, जाणून घ्या आज तुमच्या भागात कसे असेल हवामान?

ढिंग टांग : ‘हम्म्मऽऽ’...चा हुंकार!

SCROLL FOR NEXT