Nabiv couple with baby Ibrahim from Uzbekistan and head of HCG Humanity Cancer Center Dr. Raj Nagarkar esakal
नाशिक

Nashik: उझबेकिस्तानच्‍या चिमुकल्‍याची कर्करोगावर मात! HCG मानवता कॅन्‍सर सेंटरमध्ये यशस्‍वी शस्‍त्रक्रिया

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : सातासमुद्रापार मोठ्या आशेने आलेल्या दांपत्याच्या कर्करोगाने पीडित अवघ्या एक वर्षाच्या बालकावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्याची किमया येथील एचसीजी मानवता कॅन्सर सेंटरमधील डॉक्टरांच्या पथकाने केली आहे.

सेंटरचे सीईओ डॉ. राज नगरकर यांनी सोमवारी (ता. ३) पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. (child of Uzbekistan overcomes cancer Successful surgery at HCG Humanity Cancer Center Nashik news)

उझबेकिस्तान येथील नबीव्‍ह दांपत्याचा मुलगा इब्रेहिम आठ महिन्यांचा असताना त्याच्या पोटात गाठ असल्याचे निरीक्षण आईने नोंदविले होते. तपासणीअंती त्याला ‘हिपॅटो ब्लास्टोमा’ हा कर्करोग असल्याचे निदान झाले.

त्याच्या यकृतात तब्बल १२ सेंटिमीटर व ८५० ग्रॅमची गाठ झाली होती. तेथील स्थानिक रुग्‍णालयांत तपासण्या केल्यानंतर डॉक्‍टरांनी इब्रेहिमला केमोथेरेपीच्‍या आठ सायकल दिल्‍या. तरीही गाठ कमी न झाल्याने त्यांनी आशा सोडली होती.

त्यावर उपचाराबाबत माहितीची शोधाशोध केली असता नबीव्ह दांपत्याला एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरबाबत माहिती मिळाली. तेव्हा त्यांनी थेट नाशिक गाठले. येथील एचसीजी मानवता कॅन्सर सेंटरच्या टीमने या दांपत्याला व्हिसापासून अन्‍य तरतुदींसाठी मदत केली. केमोथेरेपीनंतर नुकतीच यशस्वी शस्‍त्रक्रिया केल्याचे डॉ. नगरकर यांनी सांगितले.

यांचे लाभले सहकार्य

इब्रेहिमच्‍या यकृताचा अर्ध्याहून अधिक भाग गाठीने व्‍यापलेला होता. त्यामुळे आधी दोन केमोथेरेपी सायकल व त्‍यानंतर नुकतीच यशस्‍वी शस्‍त्रक्रिया केली. त्यासाठी डॉ. नगरकर यांना डॉ. श्रुती काटे, डॉ. गायत्री रहेजा, डॉ. विकास जैन, डॉ. अविनाश गायकवाड, डॉ. नयना कुलकर्णी, रवींद्र तांदळे, डॉ. शीतल राजपूत, डॉ. शिरीष देव, डॉ. बोरसे यांनी सहकार्य केले.

हेही वाचा : शॉर्ट सेलर्स म्हणजे नक्की कोण?

आर्थिक परिस्थितीतही सहकार्य

डॉ. नगरकर म्‍हणाले, की नबीव्‍ह दांपत्‍याने भारतातही अन्‍य काही रुग्‍णालयांत चौकशी करून शस्त्रक्रियेची तयारीही दर्शविली होती. परंतु त्‍यासाठी दहा ते १२ लाख रुपये खर्च सांगितला. त्यांची आर्थिक परिस्थिती कमकुवत असल्‍याने त्‍यांनी एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटर येथे शस्त्रक्रियेचा निर्णय घेतला. रुग्‍णालयाच्‍या टीमने त्यांना अर्थसहाय्यासाठीही मदत केली.

गुंतागुंतीची शस्‍त्रक्रिया

दुर्मिळ कर्करोगाचे निदान व इतकी मोठी गुंतागुंतीची शस्‍त्रक्रिया यापूर्वी संपूर्ण उत्तर महाराष्ट्रात झालेली नव्‍हती. बालकाची शस्‍त्रक्रिया करताना अनेक आव्‍हाने होती. तीन तासांच्‍या शस्‍त्रक्रियेत अत्यल्प रक्तस्राव झाला. बालकाचे अवघे २५-३० एमएल रक्‍त निघाले. शस्‍त्रक्रियेनंतर चार तासांत बालकाने पाणी घेतले. दोन दिवसांनी व्‍यवस्‍थित आहार घेण्यासह तो हसू-बोलू अन् खेळूही लागला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

SCROLL FOR NEXT