Students participating in the caricature drawing competition of 'Sakal-Yin' art festival organized at , MVP's MSW College
Students participating in the caricature drawing competition of 'Sakal-Yin' art festival organized at , MVP's MSW College esakal
नाशिक

YIN Arts Festival : रंग-रेषा रेखाटण्यात हरपली मुले

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : रंगाच्या विविध छटा आणि या रंग-रेषा रेखाटून आजच्या समाज जीवनाचे प्रतिबिंब कागदावर उतरविले खरे; परंतु त्यातही तिरकसपणाने रंग-रेषांच्या माध्यमातून भाष्य करण्यात मुले रमले. निमित्त होते, ‘सकाळ’च्या यिन कला महोत्सवाचे. (Children Participation in caricature competition at YIN Arts Festival Nashik news)

गंगापूर रोडवरील मविप्र संस्थेचे एमएसडब्ल्यू महाविद्यालयाच्या प्रांगणात ‘सकाळ’च्या यिन कला महोत्सवांतर्गत विद्यार्थ्यांसाठीच्या विविध स्पर्धांना आज प्रारंभ झाला. एमएसडब्ल्यू महाविद्यालयाच्या हिरवळीवर व्यंग्यचित्र स्पर्धेला शुक्रवारी (ता. ११) सकाळी सुरवात झाली. नाशिक शहरातील के. के. वाघ कृषी महाविद्यालय, मविप्रच्या सीएमसीएस कॉलेज, केडीएसपी महाविद्यालय यांसह मालेगावातील एमएसजी कॉलेज, कळवण कॉलेज, सटाणा कॉलेज, एसयूकेटी कॉलेज, भाटिया कॉलेज या महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.

स्पर्धेसाठी राजकीय, क्रीडा, सोशल मीडिया, स्वातंत्र्यसैनिक, कल्चर या विषयांवर विद्यार्थ्यांना व्यंग्यचित्रे रेखाटायची होती. त्यासाठी त्यांना सुमारे चार तासांचा अवधी देण्यात आलेला होता. स्पर्धेतील उत्साहाने भारावलेल्या विद्यार्थ्यांनी एमएसडब्ल्यू महाविद्यालयाच्या मुख्य प्रांगणातील हिरवळीवरच ठाण मांडले आणि कल्पनेतील व्यंग्यचित्र रेखाटण्यासाठीच्या पांढऱ्या कागदावर रंग-रेषांचा खेळ सुरू झाला. आजच्या सामाजिकतेचे प्रतिबिंबच अनेकांच्या व्यंग्यचित्रातून व्यक्त होताना दिसत होते.

तर काहींनी थेट सामाजिक प्रश्‍नांवर व्यंग्यचित्रांच्या माध्यमातून चित्र रेखाटले. महाविद्यालयात सुरू असलेल्या अन्य स्पर्धांतील विद्यार्थ्यांसह महाविद्यालयाचे विद्यार्थीही व्यंग्यचित्रे रेखाटणाऱ्या विद्यार्थ्यांची कलाकृती उत्सुकतेने न्याहाळत होते. या स्पर्धेसाठी चित्रकार सतीश सोनवणे यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.

"‘सकाळ-यिन’च्या माध्यमातून व्यंग्यचित्रे रेखाटणाऱ्या कलावंतांसाठी व्यासपीठच उभे राहिले आहे. महाविद्यालयीन जीवनातच जर विद्यार्थ्यांना अशाप्रकारे व्यासपीठ मिळाले, तर त्यांना भविष्यात उज्ज्वल भवितव्य उपलब्ध होऊ शकते. अशा उपक्रमांतून विद्यार्थ्यांच्या सामाजिक जाणीवा अधिक प्रगल्भ होतात. तसेच या कलावंत विद्यार्थ्यांना व्यासपीठ मिळाल्याने त्यांना प्रोत्साहनही मिळते. असे उपक्रम सातत्याने व्हायला हवेत."

-सतीश सोनवणे, चित्रकार, नाशिक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi : ‘सीएए’ कोणीही हटवू शकत नाही; पंतप्रधानांची आझमगडच्या सभेत स्पष्टोक्ती,‘सप’च्या राजवटीत यूपीत गुंडगिरी

पुण्याचा चालता-बोलता इतिहास

Loksabha Election : पहिल्या चार टप्प्यांत ६६.९५ टक्के मतदान ; अधिकाधिक मतदानाचे आयोगाचे आवाहन

Mayawati : ‘इंडिया आघाडीने दुटप्पीपणा करू नये’

लक्षवेधी लढत : गांधी कुटुंबाचा बालेकिल्ला अभेद्य राहणार?

SCROLL FOR NEXT