Cricket commentator Sanjay Manjrekar with children who have successfully undergone cochlear implant surgery esakal
नाशिक

Nashik:..अन ती बालके ऐकायला-बोलायला लागली! डॉ. इंदोरवाला हॉस्‍पिटलमध्ये 30 बालकांवर कॉक्‍लिअर इम्‍प्‍लांट

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : जन्मतः कर्णबधिरत्‍वामुळे अंधारमय भविष्य असलेल्‍या तळागाळातील ३० बालकांना जगण्याची नवी उमेद मिळाली आहे.

भारत पेट्रोलियम कंपनीच्‍या आर्थिक मदतीतून व डॉ. शब्‍बीर इंदोरवाला ट्रस्‍टच्‍या सहकार्याने या बालकांवर कॉक्‍लियर इमप्‍लांट शस्‍त्रक्रिया करण्यात आली असून, यानंतर ही बालके ऐकायला अन् बोलायलादेखील लागली आहेत. (children started listening and speaking Cochlear implants on 30 children at Dr Indorewala Hospital Nashik)

या बालकांचा स्‍नेहमेळावा सोमवारी (ता. ३) इंदोरवाला हॉस्‍पिटल येथे पार पडला. या कार्यक्रमास क्रिकेट समालोचक संजय मांजरेकर, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडचे आशीष परुळेकर, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, डॉ. शब्‍बीर इंदोरवाला आदी उपस्‍थित होते. मान्‍यवरांच्‍या हस्‍ते वृक्षारोपण करण्यात आले.

यावेळी या बालकांनी आपल्‍यातील कलांचे प्रदर्शन केले. कान- नाक- घसा तज्‍ज्ञ डॉ. शब्बीर इंदोरवाला यांनी तीन महिन्यात सुमारे पन्नासहून अधिक कॉक्लिअर इम्प्लांट शस्त्रक्रिया पार पाडल्‍या आहेत.

ही अत्‍यंत खर्चिक शस्‍त्रक्रिया असून, एका शस्‍त्रक्रियेसाठी सुमारे आठ लाख रुपयांपर्यंत खर्च येतो. जन्मजात बहिरी असलेल्‍या बालकांचे जीवन अत्‍यंत खडतर असते. अशात दुर्बल घटकातील बालकांचे जीवन अंधारमय असताना, त्‍यांच्‍या पालकांकडे शस्‍त्रक्रियेसाठी आर्थिक परिस्‍थिती नव्‍हती.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

अशात सामाजिक दायित्‍व पार पाडताना ३० बालकांची शस्‍त्रक्रिया बीपीसीएलच्‍या आर्थिक पाठबळातून या अंधारातून बाहेर काढण्यात यश आलेले आहे.

जन्‍मजात बालकांना ऐकू येत नसेल, तर अशा बालकांनी त्वरित तपासणी करून उपचार प्रक्रियेत सहभागी व्‍हावे, असे आवाहन इंदोरवाला ईएनटी हॉस्पिटलचे मुख्य कार्यकारी अधिकारी युसूफ पंजाब यांनी केले आहे.

हजारात दोन बालक बधीर : डॉ.इंदोरवाला

साधारणतः एक हजार बालकांमध्ये दोन बालकांना जन्‍मजात बधीरत्‍व असते. अशा बालकांना कॉक्‍लिअर इम्‍प्‍लांट शस्‍त्रक्रियेच्‍या साहाय्याने ऐकू येऊ शकते.

जितक्‍या कमी वयात अशा बालकांची शस्‍त्रक्रिया झाली तितका त्‍यांना फायदा अधिक होत असतो, अशी माहिती डॉ.शब्‍बीर इंदोरवाला यांनी दिली. शासनाच्‍या विविध योजना उपलब्‍ध असल्‍याने पालकांनी केवळ पुढाकार घेत उपचार प्रक्रियेत येण्याची आवश्‍यकता त्‍यांनी व्‍यक्‍त केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bengal sports minister resigns : कोलकातामध्ये मेस्सीच्या कार्यक्रमात उडालेल्या गोंधळानंतर अखेर बंगालचे क्रीडामंत्र्यांनी दिला राजीनामा!

IPL 2026 Auction live : Mumbai Indians ची अन्य फ्रँचायझीकडून होतेय कोंडी! आकाश अंबानींच्या चेहऱ्यावर निराशा... Memes Viral

IPL 2026 Auction Live : राजस्थानमधील १९ वर्षीय पोराच्या डोक्यावर CSK ने ठेवला हात! मोजले तब्बल १४ कोटी; Who is Kartik Sharma?

द फॅमिली मॅन फेम अभिनेत्याची ड्रग तस्करी प्रकरणात तुरुंगात रवानगी; फिल्म इंडस्ट्रीतील ओळखीचा करत होता गैरवापर

Mumbai: आता ऑनलाइन अपॉइंटमेंट, आरोग्य माहिती आणि प्रमाणपत्रे एका नंबरवर मिळणार! बीएमसीकडून हेल्थ चॅटबॉट सेवा सुरू, नागरिकांना दिलासा

SCROLL FOR NEXT