CHM26B03596
चिमठाणे : ग्रुप ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी कपिल गिरासे यांची बिनविरोध निवड झाल्यानंतर जल्लोष करताना.
--------
चिमठाणेच्या उपसरपंचपदी
कपिल गिरासे बिनविरोध
सकाळ वृत्तसेवा
चिमठाणे, ता. २८ : चिमठाणे (ता. शिंदखेडा) येथील ग्रुप ग्रामपंचायतीची उपसरपंच निवडणूक बुधवारी (ता. २८) दुपारी दोनला झाली. उपसरपंचपदासाठी कपिल मोहनसिंग गिरासे यांचा एकमेव नामनिर्देशन अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे लोकनियुक्त सरपंच छोट्याबाई दरबारसिंग गिरासे यांनी जाहीर केले.
चिमठाणे ग्रुप ग्रामपंचायतीचे उपसरपंच दिनेश शंकर चौधरी यांनी आवर्तन पद्धतीने राजीनामा दिल्याने रिक्त पदासाठी बुधवारी लोकनियुक्त सरपंच छोट्याबाई गिरासे यांच्या अध्यक्षतेखालील विशेष बैठक बोलावण्यात आली होती. उपसरपंच पदासाठी कपिल गिरासे यांनी नामनिर्देशन अर्ज दाखल केले. सूचक म्हणून सुभाष देवमण भिल होते. कपिल गिरासे याचा एकमेव अर्ज आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी छोट्याबाई गिरासे यांनी बिनविरोध निवड केली. याग्रामपंचायत अधिकारी एस. पी. पाटील यांनी निवडणूक प्रक्रिया पार पाडली.
या वेळी ग्रामपंचायत सदस्य सुरतसिंह गिरासे, दिनेश चौधरी, दिलीपसिंह (फौजी) गिरासे, अरविंद कासार, शालिनी पाटील, छायाबाई धनगर, जिजाबाई भिल, सुभाष भिल, चंद्रकला भोई, मनीषा नगराळे, योगिता कोळी व बानूबाई भिल उपस्थित होते. जिल्हा परिषदेचे माजी सदस्य वीरेंद्रसिंह गिरासे, दरबारसिंह गिरासे, दोंडाईचा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक रोशन टाटिया, महेंद्रसिंह गिरासे, रणजीतसिंह गिरासे, जितेंद्र गिरासे यांनी गिरासे यांचा सत्कार केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.