नाशिक

आता चीन-पाकिस्‍तानशी मैत्री नव्हे; तर युद्धच

नितीन गोखले : डॉ. मुंजे जयंतीनिमित्त व्‍याख्यानमाला

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : भारत तत्त्वनिष्ठ देश असल्‍याची प्रतिमा निर्माण करण्यासाठी काही वर्षांपूर्वीपर्यंत विदेश नीती आखली जात होती; परंतु आता ‘भारत प्रथम’ला प्राधान्‍य देताना राष्ट्रहिताचे निर्णय घेतले जात आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रारंभी चीन, पाकिस्‍तानपुढे मैत्रीचा हात केला; परंतु दोन्‍ही देशांकडून कुरापती काढण्यात आल्‍या. आता या देशांसोबत मैत्री नव्‍हे, होईल तर युद्धच असे धोरण निर्धारित करताना इंडो स्‍पेसिफिक क्षेत्रातील देशांशी मैत्रीपूर्ण संबंध वाढविण्यावर भर दिला जात आहे, असे प्रतिपादन संरक्षणतज्‍ज्ञ, ज्‍येष्ठ पत्रकार नितीन गोखले यांनी सोमवारी (ता. १३) येथे केले.

गंगापूर रोडवरील रावसाहेब थोरात सभागृहात सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्‍युकेशन सोसायटीतर्फे डॉ. बा. शि. मुंजे यांच्‍या १४९ व्‍या जयंतीनिमित्त सुरू असलेल्या व्‍याख्यानमालेत ते बोलत होते. संस्‍थेच्‍या नाशिक विभागाचे कार्यवाह हेमंत देशपांडे अध्यक्षस्‍थानी होते. गुरू गोविंदसिंग फाउंडेशनचे रणजितसिंग आनंद यांच्‍यासह सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्‍युकेशन सोसायटीचे सरकार्यवाह डॉ. दिलीप बेलगावकर, नाशिक विभागाचे अध्यक्ष कॅप्‍टन श्रीपाद नरावणे, सहकार्यवाह नितीन गर्गे आदी उपस्‍थित होते.

श्री. गोखले म्‍हणाले, की सुरवातीला चीनने अमेरिका व युरोपीय देशांच्‍या मदतीने दबदबा वाढविला. आता महासत्ता होण्याची स्‍वप्‍ने पाहत आहे. त्‍यासाठी भारताला आशिया स्‍तरावर मर्यादित ठेवण्याचे अतोनात प्रयत्‍न करत आहे; परंतु भारतानेही आता आपल्या संरक्षण व विदेश नीतीमध्ये गेल्‍या काही वर्षांमध्ये बदल केला आहे. याअंतर्गत इंडो स्‍पेसिफिक क्षेत्रातील देशांशी मैत्रीपूर्ण संबंध प्रस्‍थापित केले आहेत. आगामी काही वर्षांमध्ये यातील काही देशांत भारताच्‍या सहकार्याने प्रकल्‍प उभे राहतील. साम, दाम, दंडभेदाची नीती भारताने आता अवलंबली असून, यामुळे आगामी काळी वर्षात भौगोलिक राजनीतीच्‍या स्‍तरावर भारताचे महत्त्व वाढेल, असा विश्‍वास त्‍यांनी व्‍यक्‍त केला.

चीनला भारताचे चोख प्रत्युत्तर

पाकिस्‍तान हा पूर्णपणे चीनच्‍या दबावाखाली आलेला असून, श्रीलंका, भूतानसह अन्‍य विविध देशांना कर्ज उपलब्‍ध करून देताना चीन त्‍यांच्‍यावर प्रभुत्व गाजवीत आहे. या माध्यमातून भारताला रोखण्याचे कट-कारस्थान चीनचे आहे. मात्र, त्‍यास प्रत्युत्तर देताना भारत एकीकडे अमेरिका, रशियासारख्या बलाढ्य देशांसोबत आपले संबंध दृढ करतो आहे, तर दुसरीकडे भूतान, नेपाळ, बँकॉक, जपान यांच्‍याशी संबंध सुधरवत कूटनीतीत एक पाऊल पुढे टाकले जाते आहे.

भविष्यातील युद्ध सागरी मार्गातून

आता भूमार्गाने युद्ध होण्याची शक्‍यता कमी असून, सागरी मार्गाने भविष्यात युद्ध लढले जाण्याची शक्‍यता श्री. गोखले यांनी वर्तविली. हिंद महासागरात भारताचा दबदबा कायम असून, नौदलाचे सध्या सुरू असलेले सक्षमीकरण भारताला कायम आघाडीवर ठेवणार असल्‍याचा विश्‍वास त्‍यांनी व्‍यक्‍त केला. सैन्‍यातील तिन्‍ही दलांतील समन्‍वयातून शत्रूंच्‍या कुठल्‍याही आव्‍हानाला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी भारत सक्षम असल्‍याचेही त्‍यांनी नमूद केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Donald Trump Iran Warning: ''इराणसोबत सामंजस्य करार नाहीच, ते फक्त एक पत्र...'', पुन्हा हल्ले करण्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा

IAS transfers: महाराष्ट्रात मोठा प्रशासकीय फेरबदल! १२ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; माजी DGP रश्मी शुक्लांवर नवी जबाबदारी

Baba Vanga Prediction : निम्मा जून उलटूनही पाऊस नाही! 2026 बद्दल बाबा वेंगाची भविष्यवाणी खरी ठरतीये का? नेमकं काय म्हटले होते?

Latest Marathi News Live Update : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जर्मनीचे चान्सलर फ्रेडरिक मर्झ यांची भेट घेतली

RBI Recruitment: विनापरीक्षा लाखो रुपयांची नोकरी, फ्रेशर्ससाठी सुवर्णसंधी; आरबीआयच्या भरतीसाठी अर्ज कसा करणार?

SCROLL FOR NEXT