Principal Kailas Bachhao, teacher Mahendra Bhamre while guiding the students of Zilla Parishad School in Chinchdar (Katarvel) about backyard garden. esakaL
नाशिक

Nashik News: चिंचदर शाळेतील शिक्षक, विद्यार्थ्यांनी फुलवली परसबाग! रोजच्या आहारात मिळतोय ताजा भाजीपाला

गोविंद अहिरे

नरकोळ : चिंचदार (कातरवेल) (ता. बागलाण) येथील प्राथमिक शाळेतील शिक्षक, विद्यार्थी, पालक यांच्या सहकार्याने शाळा आवारात परसबाग फुलविण्यात आली आहे. रोजच्या आहारात आता भाजीपालासह फळे शाळेतील विद्यार्थ्यांना चाखण्यास मिळत आहे.

विंचूर-प्रकाशा महामार्गावरील कातरवेलपासून पश्चिमेस तीन किलोमीटरवर डोंगरदरीतील चिंचदरवस्ती शाळेत गेल्या वर्षी ग्रामपंचायतीच्या मदतीने कूपनलिका झाली.

या वर्षी गटशिक्षणाधिकारी चित्रा देवरे, प्रभारी केंद्रप्रमुख चंद्रशेखर पाठक, मुख्याध्यापक कैलास बच्छाव शिक्षक महेंद्र भामरे यांच्या संकल्पनेतून पालकांना महत्त्व पटवून दिल्यानंतर शाळेची परसबाग सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. (Chinchdar school teachers students flowered garden Fresh vegetables are available in daily diet Nashik News)

या बागेमुळे विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाप्रमाणे प्रत्यक्ष फळबागा, पालेभाज्या, फळभाज्या यांचे महत्त्व पटले असून, यात रोजच्या परिपाठात फळभाज्यांसह पालेभाज्यामध्ये असलेले जीवनसत्त्व याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मिळते.

विशेष बाब म्हणजे यंदा दुष्काळ असूनही पाण्याची काटकसर करत ही बाग फुलवण्यात आली आहे. बाग फुलविण्यसाठी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्यामराव चव्हाण, सदस्य निंबा माळी, अनिल ठाकरे, संदीप माळी,

मनीषा चव्हाण, शांताबाई चव्हाण, विमल माळी, कमल पवार, लक्ष्मण माळी, संगीता माळी, गोकुळ सोनवणे, शिला माळी यांच्यासह शिक्षक महेंद्र भामरे, मुख्याध्यापक कैलास बच्छाव यांनी प्रयत्न केले. परसबागेत वांगे, बटाटे, कोथिंबीर, मिरची, टोमॅटो, भेंडी, गवती चहा, आले, शेंगा, लिंबू, पपई, आवळा, सीताफळ लावण्यात आले आहेत.

"विद्यार्थ्यांना पौष्टिक पालेभाज्या व फळभाज्यांची ओळख व्हावी, या उद्देशाने शाळेच्या मोकळ्या जागेत विभाग फुलवल्याने शाळेतील चिमुकल्यांना आहारात आता भाजीपाल्याची विकत घेण्याची गरज भासणार नाही."- महेंद्र भामरे, शिक्षक, चिंचदर जि.प. शाळा

"शाळेतील शिक्षक, मुख्याध्यापक यांनी आम्हाला परसबागेचे महत्त्व समजून दिल्यानंतर आम्हीही बाग तयार करण्यासाठी विद्यार्थ्यांना मदत केली. त्यामुळे बाग पाहून आनंद वाटतो."

- श्यामराव चव्हाण, अध्यक्ष, शालेय व्यवस्थापन समिती, चिंचदर जि. प. शाळा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

फडणवीसांना अडचणीत आणायला जरांगेंना रसद पुरवताय का? शिंदे म्हणाले, मी लपून-छपून काही करत नाही

Chhagan Bhujbal : ओबीसी नेत्यांची आज मुंबईत बैठक, मंत्री छगन भुजबळ यांच्याकडून आयोजन; जरांगेच्या मागणीला विरोध

राज्य सरकार घेणार ‘हे’ 2 मोठे निर्णय! 5 वर्षांत थकबाकीदार नसलेलाच यापुढे ग्रामपंचायत निवडणुकीस पात्र; ग्रामपंचायतीचा एकरकमी कर भरल्यास मिळणार 50 टक्के माफी

JP Nadda: गणेश उत्सवात शहराला भेट देणं माझं भाग्य, केंद्रीय मंत्री मुंबईतील गणरायाच्या चरणी नतमस्तक

Hotel Bhagyashree : जरांगेंचं आंदोलन सुरु असेपर्यंत हॉटेल भाग्यश्री बंद; आंदोलकांसाठी ट्रकभर शिधा मुंबईला पाठवला...

SCROLL FOR NEXT