नाशिक

चिनी फटाक्यांवर बंदी विकणाऱ्यांवर कारवाई व्हावी

CD
फोटो : NSK26H34169 नंदुरबार : जिल्हा पोलिस अधिक्षक अश्‍विनी सानप यांना निवेदन देतांना हिंदु सेवा सहाय्य समितीचे डॉ. नरेंद्र पाटील व पदाधिकारी. ---------------- चिनी बनावटीचे फटाके विकणाऱ्यांवर कारवाई व्हावी नंदुरबार, ता. २ : चिनी बनावटीचे फटाके स्वस्त असले, तरी ते अत्यंत प्रदूषणकारी आहेत. त्यावर भारत सरकारने बंदी घातली आहे. त्यामुळे चिनी फटाके विक्री करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी जिल्हाधिकारी डॉ. मिताली सेठी आणि जिल्हा पोलिस अधीक्षक अश्‍विनी सानप यांच्याकडे हिंदु सेवा सहाय्य समितीने निवेदनाद्वारे करण्यात आली. निवेदनात म्हटले आहे की, भारतात गेल्या काही वर्षांपासून चिनी फटाक्यांचे प्रमाण वाढले आहे. या फटाक्यांमध्ये घातक विषारी पदार्थांचे प्रमाण अधिक आहे. ते तयार करण्यासाठी पोटॅशिअम क्लोराईड आणि पोटॅशिअम परक्लोराईड यांचे रासायनिक मिश्रण वापरले जाते. भारतात या रासायनिक पदार्थांच्या वापरावर बंदी असतांना चिनी बनावटीचे फटाके अवैध मार्गाने देशात येऊन त्याची विक्री होत आहे. त्यावर कारवाई करून विक्रीस प्रशासनाने बंदी आणावी. तसेच, विक्री करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी. निवेदन देतांना हिंदु सेवा सहाय्य समितीचे डॉ. नरेंद्र पाटील, पंकज मुसळे, विनायक राजपूत, पृथ्वीसिंह राजपूत आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court: यंदाच्या दिवळीत फक्त ग्रीन फटाके फोडण्यासच सर्वोच्च न्यायालयाची परवानगी; वेळेची मर्यादाही केली निश्चित

Patan Leopard Attack: घरात टीव्ही पाहत बसलेल्या व्यक्तीवर बिबट्याचा हल्ला; डोक्याला गंभीर दुखापत, पाटण तालुक्यात खळबळ, महिला भांडी घासत हाेती अन्..

Maharashtra District Courts Bomb Threat : न्यायव्यवस्था हादरली! पुण्याच्या शिवाजीनगरसह राज्यभरातील न्यायालयांना बॉम्बने उडवण्याची धमकी; एकाच वेळी मेल आल्याने मोठी खळबळ

Palghar Court: महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांतील न्यायालयांना धमक्या! पालघर न्यायालयाला बॉम्बस्फोटाची धमकी; ई-मेलमुळे खळबळ, संपूर्ण परिसर रिकामा

Maharashtra Drought: महाराष्ट्रात ऑक्टोबरमध्ये ९५ टक्के कमी पाऊस; मराठवाडा कोरडा, दुष्काळाचे संकट आणखी गडद

SCROLL FOR NEXT