NSK26H31828 : चिन्मय सपकाळे
---
विजेचा धक्का लागून
वारकरी विद्यार्थ्याचा मृत्यू
सावखेडा शिवारात वायर जोडताना घडली घटना
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. ९ : बोअरिंगच्या मोटारीची निघालेली वायर पुन्हा जोडताना विजेचा जोरदार धक्का लागून चिन्मय मंगेश सपकाळे (वय १४, मूळ रा. गलंगी, ता. चोपडा) या वारकरी विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी (ता. ९) सावखेडा शिवारातील राधाकृष्ण वारकरी संस्थेत घडली. या प्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
चिन्मय हा गेल्या दोन वर्षांपासून सावखेडा शिवारातील राधाकृष्ण वारकरी संस्थेत वारकरी शिक्षण घेत होता. या संस्थेत विविध ठिकाणचे विद्यार्थी शिक्षण घेत असून तेथेच वास्तव्यास आहेत. शुक्रवारी सकाळी संस्थेच्या परिसरात बोअरिंगची मोटार सुरू होती. त्या ठिकाणाहून जात असताना चिन्मयचा पाय मोटारीच्या वायरमध्ये अडकला. त्यामुळे वायर निघाली. ही वायर पुन्हा जोडण्याचा प्रयत्न करत असताना त्याला विजेचा जोरदार धक्का बसला. या घटनेनंतर चिन्मयला तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तपासणीनंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच त्याचे नातेवाईक रुग्णालयात पोहोचले. चिन्मयच्या अकाली मृत्यूने हळहळ व्यक्त होत आहे. त्याच्या पश्चात वडील आणि दोन मोठ्या बहिणी असा परिवार आहे. या घटनेची नोंद तालुका पोलिस ठाण्यात करण्यात आली असून, पुढील तपास पोलिस करीत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.