Village gang while beating youth. esakal
नाशिक

Nashik Crime News : सिडकोत गावगुंडांचा 2 तरुणांवर हल्ला; पोलिसांचा वचकच शिल्लक नाही!

सकाळ वृत्तसेवा

सिडको (जि. नाशिक) : परिसरातील राणाप्रताप चौकात काहीही कारण नसताना गावागुंडांनी येऊन दोन तरुणांवर लाठ्याकाठ्यांनी मारहाण केली. या गावागुंडांच्या भीतीमुळे मारहाण झालेल्या तरुणांनी पोलिसात तक्रार देणे देखील टाळले असल्याची बाब समोर आली आहे.

या परिसरात पोलिसांचा धाकच राहिला नसल्यामुळे या गावगुंडांचे फावते असल्याचे चित्र आहे. (cidco village goons attack 2 youths There no police left Nashik Crime News)

हेही वाचा : योग्य वेळेतच करा इच्छापत्र आणि व्हा चिंतामुक्त

दोन तरुणांवर लाठ्याकाठ्यांनी केलेल्या मारहाणीचा सीसीटीव्ही फुटेजही समोर आला असून शनिवारी (ता. ७) रात्री साडेदहाच्या सुमारास हा प्रकार घडला आहे. या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे सावट निर्माण झाले आहे.

शनिवारी रात्री साडे दहाच्या सुमारास पाच जण दोन दुचाकीवरून आल्यानंतर त्यांची या दोन तरुणांची बाचाबाची झाली. त्यानंतर त्यांनी लाकडी दांड्याच्या साहाय्याने या दोन तरुणांना मारहाण करून येथून पळ काढला. विशेष म्हणजे दोन दिवस उलटूनही या गंभीर प्रकाराबाबत कोणीही तक्रार देण्यासाठी पुढे आलेले नाही. .

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubhanshu Shukla Research : शुभांशु शुक्लांनी अंतराळात केला थरारक प्रयोग! बनले 'या' खास गोष्टीवर संशोधन करणारे पहिले भारतीय..

Nagpur Fraud: खोट्या रजिस्ट्रीच्या आधारे उचलले ३८ लाखांचे गृहकर्ज

Pune News : रस्त्याच्या मधोमध झाडामुळे अपघाताचा धोका; प्रयेजा सिटी सोसायटी परिसरातील स्थिती, जवळच शाळा असल्याने चिंता

Latest Maharashtra News Live Updates: अर्जेंटिनाचा यशस्वी दौऱ्यानंतर , पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं ब्राझीलची राजधानी रिओ दि जनेरियो इथं भव्य स्वागत

Pune News : नानासाहेब पेशवेंच्या समाधीची दुरवस्था; परिसरात कचऱ्याची समस्या; महापालिकेच्या दुर्लक्षामुळे ऐतिहासिक वारसा उपेक्षित

SCROLL FOR NEXT