Dandiya esakal
नाशिक

Nashik News : दांडियातून बक्षिसांची खैरात, चर्चा मात्र खर्चाचीच! निवडणुकीच्या तोंडावर उलटसुलट चर्चा

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : नाशिक महापालिकेवर गेल्या दीड -पावणेदोन वर्षांपासून प्रशासकीय राजवट सुरू आहे. येत्या काही महिन्यांमध्ये निवडणुकीची चाहूल लागल्याने माजी नगरसेवक आणि इच्छुकांना पुन्हा नगरसेवकपदाचे वेध लागले आहेत.

त्यामुळेच की काय, यंदाच्या नवरात्रोत्सवात गुडघ्याला बाशिंग बांधून असणाऱ्यांनी दांडियाचे आयोजन केले होते. (citizen discussion about expenses in navratri dandiya nashik news)

झगमगाट करताना दांडिया खेळण्यासाठी येणाऱ्या महिलांसाठी एकापेक्षा अधिक बक्षिसांची योजनाच राबविली होती. परंतु परिसरातील जाणकार नागरिकांमध्ये ‘पैसा आला कोठून’ अशी दबक्या आवाजातील चर्चा मात्र सर्वांचेच लक्षवेधक ठरली. एवढेच नव्हे ‘इकडे इडी नाही का येत’ असेही उपहासातून बोलले जात होते.

नुकताच नवरात्रोत्सव आटोपला. परंतु यंदाचा नवरात्रोत्सवात ठिकठिकाणी दांडियाचे करण्यात आले. याचे आयोजन शहरात चर्चेचा विषय ठरला होता. महापालिकेत सध्या प्रशासकीय राजवट आहे. नगरसेवक नाहीत. परंतु येत्या काही महिन्यांमध्ये निवडणुका जाहीर झाल्या तर, ऐनवेळी मतदारांपर्यंत पोचणे शक्य होईल की नाही; त्यापेक्षा नवरात्रोत्सवात दांडियाच्या माध्यमातून आपापल्या परिसरातील नागरिकांपर्यंत आपले ‘मनसुबा’ पोचविण्याचा प्रयत्न अनेकांनी केला.

एवढेच नाही तर, प्रभागात एकाच पक्षातील अनेक इच्छुक असल्याने त्यांच्यातही चढाओढ लागल्याचे या दांडियातून दिसून आले. शहरात अगदी एकाच कॉलनीमध्ये दोन मैदाने असतील तर त्या दोन्ही मैदानांवर इच्छुकांनी दांडियाचे आयोजन केले होते. काहींनी तर मंगल कार्यालयेच भाड्याने घेत परिसरातील नागरिकांसाठी दांडियाचे आयोजन केले.

इच्छुकांकडून लाईटिंगचा झगमगाट, साउंड सिस्टिमची सोय केली होती. एवढेच नव्हे दांडिया खेळण्यासाठी येणाऱ्या महिलांसाठी सोन्याची नथ, पैठणी साड्यापासून ते चांदीचे लक्ष्मीचे नाणे, लहान मुलांसाठी आकर्षक भेटवस्तू, कुपन अशी एका ना अनेक प्रकारच्या बक्षिसांची दररोज वाटप केली. या बक्षिसांच्या हव्यासापोटी महिलांचीही दांडियासाठी गर्दी होत होती. त्यामुळे इच्छुकाचा ‘मनसुबा’ साध्य झाला असला तरी परिसरातील नागरिकांमधील चर्चा मात्र लक्ष वेधणाऱ्या होत्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तब्बल 18 वर्षांनंतर ठाकरे बंधू दिसणार एकाच मंचावर; शिवसेना-मनसेची आज संयुक्त विजयी रॅली, मराठीसाठी 'या' नेत्यांची धडाडणार तोफ

मोठी बातमी! आषाढी सोहळ्याच्या रात्री उघडणार उजनी धरणाचे १६ दरवाजे; सध्या धरणात १७ हजार क्युसेकची आवक, धरणाची पाणीपातळी ७७ टक्क्यांवर

PM Narendra Modi: भारतासाठी आकाशही ठेंगणे; पंतप्रधान मोदी यांचे गौरवोद्‌गार

Latest Maharashtra News Updates : विजयी मेळाव्यानिमित्त ठाकरे बंधू येणार एकाच व्यासपीठावर, शिवसेना-मनसेचा आज भव्य मेळावा

Ashadi Wari 2025: पंढरीची वारी पोचली लंडनच्या दारी!विठ्ठल-रुक्मिणीच्या पादुकांसह २२ देशांतून ७० दिवसांचा प्रवास

SCROLL FOR NEXT