covid vaccine covid vaccine
नाशिक

लसीकरण नोंदणीचा आनंद औटघटकेचा; अनेकांकडून मनस्‍ताप व्‍यक्‍त

१८ ते ४४ वयोगटातील व्‍यक्‍तींकडून ऑनलाइन नोंदणी करत लसीकरणाची वेळ नोंदविताना दमछाक होत आहे.

अरुण मलानी

नाशिक : कोरोना महामारीच्या वाढत्‍या प्रादुर्भावाने सर्वांनीच धसका घेतला आहे. लवकर लसीकरण (Vaccination) करून घेण्यावर भर दिला जात आहे. १८ ते ४४ वयोगटातील व्‍यक्‍तींकडून ऑनलाइन नोंदणी (Online Booking) करत लसीकरणाची वेळ नोंदविताना दमछाक होत आहे. बुकिंग रद्द झाल्‍याचा संदेश अनेकांना प्राप्त होत असल्‍याने लसीकरण नोंदणीचा आनंद औटघटकेचा ठरत आहे. दरम्‍यान, या प्रकारामुळे अनेकांकडून मनस्‍ताप व्‍यक्‍त होत आहे. (Citizens are getting frustrated while booking vaccinations Slot online)

१ मेपासून १८ ते ४४ वयोगटातील व्‍यक्तींसाठीही कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा विस्‍तार केला आहे. परंतु लाभार्थ्यांच्‍या तुलनेत लसींचा साठा मुबलक प्रमाणात उपलब्‍ध नसल्‍याने सर्वच वयोगटातील व्‍यक्‍तींना मनस्‍तापाला सामोरे जावे लागत आहे. १८ ते ४४ वयोगटातील व्‍यक्‍तींना लसीकरण मोहिमेत सहभागी होण्यासाठी को-विन ॲप किंवा पोर्टल, तसेच आरोग्‍य सेतू व उमंग ॲपद्वारे नोंदणी करायची आहे. यानंतर सोयीची तारीख व वेळेची बुकिंग (अपॉइंटमेंट) घेणे बंधनकारक आहे. लसीकरणास इच्‍छुक असलेल्‍यांची संख्या मोठी असल्‍याने संकेतस्‍थळावरील केंद्रांसाठीची बुकिंग काही मिनिटांमध्ये फु‍ल होऊन जात आहे. मोठे कष्ट घेऊन काहींना बुकिंग मिळत असल्‍याने त्‍यांच्‍याकडून आनंद व्‍यक्‍त होतो. परंतु हा आनंद औटघटकेचाच ठरत असल्‍याची सध्याची परिस्‍थिती आहे. अनेक लाभार्थ्यांना त्‍यांचे बुकिंग रद्द झाल्‍याचे संदेश प्राप्त होऊ लागले आहेत.

पंधरा दिवसांनंतरचेही बुकिंग रद्द

तांत्रिक कारणांमुळे अलीकडील काही दिवसांचे बुकिंग रद्द झाले असते, तर समजण्यासारखी गोष्ट होती. परंतु अवघ्या दोन-चार दिवसांचे नव्‍हे, तर मेअखेरीस केलेल्‍या व्‍यक्‍तींनाही त्‍यांचे बुकिंग रद्द झाल्‍याने आश्र्चर्य व निराशा व्‍यक्‍त केली जात आहे. लसीकरणासाठी स्‍लॉट मिळविण्यासाठी दमछाक करावी लागते, त्यातच असे रद्द होत असेल तर प्रक्रिया राबविण्यात अर्थ काय राहिला, असा प्रश्‍न उपस्‍थित होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Land Dispute: शेतकऱ्यांसाठी खुशखबर! जमिनीचे वाद सोडवणे झाले सोपे; महाराष्ट्र जमीन महसूल संहितेत बदल

PBKS vs RCB: वेंकटेश अय्यरची तुफानी फटकेबाजी, विराट कोहलीचंही विक्रमी अर्धशतक; बंगळुरूने पंजाबसमोर ठेवलं भलं मोठं लक्ष्य

Bhumii Utsav 2026 : बारामतीत ‘भूमी उत्सव 2026’ उन्हाळी प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद; 200 हून अधिक लघुउद्योजकांचा सहभाग

Pune Crime : उरुळी कांचनमध्ये पतीकडून पत्नीच्या गुप्तांगावर ॲसिड हल्ला; १५ दिवस घरात कैद

Pune Crime: पुणे-सोलापूर महामार्गावर मांगूर माशांची मोठी तस्करी उघड; उरुळीकांचन पोलिसांची कारवाई, पिकअप जप्त

SCROLL FOR NEXT