police test
police test esakal
नाशिक

सावधान विनाकारण बाहेर पडताय! पोलिसांच्या चाचणीत नागरिक आढळताएत पॉझिटिव्ह

योगेश मोरे

म्हसरूळ (नाशिक) : शहरासह परिसरात नागरिक संचारबंदी कायद्याचे उल्लंघन करीत, घराबाहेर अनावश्यक फिरताना पाहायला मिळत आहेत. यावर आळा बसण्यासाठी पंचवटी पोलिसांनी नामी शक्कल लढवत या अनावश्यक फिरणाऱ्या नागरिकांना पकडून त्यांना पोलीस ठाण्यात आणून त्यांची कोरोना अँटिजेन चाचणी करण्यात आली. शनिवारी (ता.17) दुपारपर्यंत सुमारे 48 नागरिकांची चाचणी करण्यात येऊन त्यात दोघेजण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले.

नागरिकांना पकडून कोरोना चाचणी

कोरोनाचे वाढते संक्रमण पाहता राज्य शासनाने 'ब्रेक द चेन' अंतर्गत राज्यात कडक निर्बंध लागू केले आहेत. असे असताना नागरिक मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले असल्याचे चित्र सर्वत्र पाहायला मिळत आहे. सर्रासपणे संचारबंदी कायद्याचे उल्लंघन होत असल्याने, पोलीस प्रशासनाची डोकेदुखी ठरत आहे. पोलिसांच्या डोळ्या देखतच कायदा धाब्यावर बसवून नागरिक कोरोना नियमांचे उल्लंघन करीत आहेत. यावर पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक भगत यांनी नामी शक्कल लढवत पंचवटी परिसरातील गोदाघाट, मालेगाव स्टँड, पंचवटी कारंजा, दिंडोरी नाका, नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती, पेठरोड, मखमलाबाद नाका आदी परिसरात अनावश्यक फिरणाऱ्या नागरिकांची शनिवारी (दि.17) सकाळ पासून धरपकड सुरू केली. पकडलेल्या या नागरिकांना पंचवटी पोलीस ठाण्यात आणण्यात आले.

2 नागरिक पॉझिटिव्ह

दुपारी या सर्वांची पंचवटी विभागीय कार्यालयातील मनपा कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने कोरोना अँटिजेन चाचणी करण्यात आली. दुपारी दोन वाजेपर्यंत जवळपास 48 नागरिकांची चाचणी करण्यात आली होती. यात 2 नागरिक पॉझिटिव्ह आढळून आले असून, हे दोघेजण म्हसरूळ व आडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारे आहेत. पॉझिटिव्ह आढळून आलेल्या या दोघांनाही पंचवटी पोलिसांनी दिंडोरी रोडवरील मेरी वसाहत मधील कोविड सेंटर येथे उपचारासाठी दाखल केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi Viral Video: "मला माहीत आहे 'डिक्टेटर' यासाठी अटक करणार नाही," ट्रोल होऊनही पंतप्रधानांचे भन्नाट उत्तर

काँग्रेसच्या प्रयत्नांवर वडेट्टीवारांनी पाणी फेरले, निवडणूक संपेपर्यंत शांत बसण्याचे निर्देश

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात.. अजित पवार, उदयनराजे भोसले यांनी केलं मतदान

Loksabha Election 2024 : मतदानाचा आज तिसरा टप्पा; राज्यातील ११ मतदारसंघांमध्ये तयारी पूर्ण

Sakal Podcast : मावळ लोकसभा मतदारसंघात कोण बाजी मारणार? ते सुनीता विल्यम्सची पुन्हा अवकाश भरारी

SCROLL FOR NEXT